Gad kot durga Ani Tyanchi Vastu ( गड कोट दुर्ग आणि त्यांची वास्तु )
Gad kot durga Ani Tyanchi Vastu ( गड कोट दुर्ग आणि त्यांची वास्तु )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
गड-किल्ल्यांचा इतिहास म्हणजे युध्दाच्याच कथा. त्या मनाला सहजच रिझवितात तसेच त्यांच्या वास्तूतील कलाकौशल्य चित्ताला तितकेच कुंठित करून टाकते. गड- किल्ले म्हणजे गतकालीन मनोनिग्रहाचे, शौर्यधैर्याचे आणि स्वार्थत्यागाने भूषविलेल्या क्षात्रवृत्तीचे बोलके भाटच होत. कोणताही गड-कोट घ्या, त्यामागे काही ना काही मानवी कर्तृत्वाचा इतिहास दडलेला प्रत्ययास येतोच. वसाहतीची निश्चिती करताना आपल्या व आपल्या भावी पिढ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे गड-कोट उभारताना फार मोठ्या, पण संबंधित, लोकसंघांनी एकजुटीने जे परिश्रम त्यात ओतले त्या परिश्रमांमागे असलेली त्यांची मनोभूमिका त्याम्च्या जबरदस्त फलाकांक्षेची ओळख पटवून देते. ही मनोभूमिकाच त्या गड कोटाम्च्या पक्क्या व सकस मालमसाल्याच्या निर्मितीला आणि अव्यंग बांधकामाला कारण झाली असल्याची साक्ष पटते. कोणत्याही गड कोटांच्या बांधकामात हलगर्जीपणा किंवा चालढकल झालेली दृष्टीस पडत नाही.
ISBN No. | :9788195478941 |
Author | :V C Bendre |
Publisher | :Marathidesha Foundation |
Binding | :Paperback |
Pages | :112 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |