Purandaracha Tah ( पुरंदरचा तह )
Purandaracha Tah ( पुरंदरचा तह )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सन १६४५ पासून शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या हालचालींना प्रारंभ झाला. स्वत:चे स्वतंत्र सार्वभौम राज्य स्थापन करण्याची उर्मी आणि महत्त्वकांक्षा त्यांच्या कार्यामध्ये सुरूवातीपासूनच आपल्याला दिसते. एकाच वेळी मुघल, आदिलशाही, पोर्तुगीज, सिद्दी आणि पुढील काळात इंग्रज अशा शत्रुंशी त्यांनी संघर्ष केला. त्यात मुघल सत्ता ही तत्कालिन भारतातील सर्वात प्रवळ अशी राष्ट्रीय पातळीवरील सत्ता होतीच पण त्या वेळच्या जगातील तीन प्रमुख महासत्तांमध्ये तिची गणना होत होती. आपल्याहून अनेक पट्टींनी मोठ्या असलेल्या ह्या बलवान सत्तेशी महाराज अतिशय चलाखीन लढा देत होते. शाहिस्तेखानाची महाराजांनी केलेली नामुष्की आणि सुरतेची १६६४ मधील पहिली लुट यानंतर बादशहा औरंगजेबाने दक्षिणेतील या उठावाची अधिक गांभीर्याने दखल घेण्याचे ठरविले आणि आपला सर्वात अनुभवी आणि कसलेला सेनापती मिर्झाराजा जयसिंग यांची या दक्षिणेच्या कामगिरीवर नेमणूक केली. मिर्झाराजांनीही अत्यंत कार्यक्षमतेने आणि धूर्तपणे ही मोहीम चालवून महाराजांना अडचणीत आणले. परिस्थितीचा योग्य अंदाज घेत पुढचं नुकसान टाळण्यासाठी आणि नव्याने सुसज्ज तयारीसाठी वेळ मिळावा यासाठी शिवाजी महाराजांनी मुघलांशी तहाची बोलणी लावली.
ISBN No. | :9788195478989 |
Author | :Dr Mahendra Khadgavat |
Publisher | :Marathidesha Foundation |
Binding | :Paperback |
Pages | :25 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |