akshardhara
Swapna Sarswat ( स्वप्न सारस्वत )
Swapna Sarswat ( स्वप्न सारस्वत )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
या कादंबरीत लेखकाने सारस्वतांच्या साडेचारशे वर्षाच्या पारतंत्र्यातल्या जगण्याचं पोर्तुगीज आणि मुसलमानांच्या अत्याचाराचं वर्णन अतिशय संयमानं आणि ओघवत्या शैलीत केलं आहे.
बहामनी सुलतानच्या काळात मुसलमान तिसवाडीतल्या गौड सारस्वतांचं धर्मांतर करतात. मुसलमानांचे आक्रमण रोखण्यासाठी पोर्तुगीज सैन्याला पाचारण केले जाते. त्यानंतर अलबुकर्कचे गोव्यात आगमन, इब्राहीम आदिलशहाचा गोव्यावर हल्ला, तेथेही अलबुकर्कची झालेली सरशी, त्याने केलेल्या मुसलमानांच्या कत्तली, त्याची वाढती दहशत, तेलंगणात पोर्तुगीजांनी केलेल्या कत्तली आणि त्यानंतर दरवर्षी दोन चार हजार पोर्तुगीज सैनिकांचा गोव्यात प्रवेश, त्याने बदलून गेलेला गोव्याचा चेहरा मोहरा, पोर्तुगिजांच्या अठरा पगड जमातींचे गोव्यात येऊन वास्तव्य करणे आणि धर्मांतराचा उडालेला भडका या पार्श्वभूमीवर ही कादंबरी घडत रहाते.
नरसप्पचय्या पै या प्रतिष्ठीत सारस्वताच्या पाच पिढ्यांच्या समोर घडत जाणारी सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक आणि ऎतिहासिक स्थित्यंतरे आणि त्या अनुषंगाने येणारी असंख्य माणसे, त्यांच्या जगण्यातील अगणित प्रसंग, त्यांच्या श्रध्दा, अंधश्रध्दा, याचे चित्रण म्हणजे ही कादंबरी होय.
ISBN No. | :9788195573554 |
Author | :Gopalkrushna Pai |
Publisher | :Anubandh Prakashan |
Translator | :Sandhya Deshpande And Aruna Naik |
Binding | :Paperback |
Pages | :511 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

