Mughal Samrajya Jahangir ( मुघल साम्राज्य जहांगीर )
Mughal Samrajya Jahangir ( मुघल साम्राज्य जहांगीर )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आग्रा सन १६०६. मुघल सल्तनतीच्या इतिहासात जहांगीरच्या रूपाने एक नवे पर्व सुरू झाले. कशाचीही भीड मुर्वत न बाळगता वेळ पडलीच तर क्रौर्याची परिसीमा गाठभारा जहांगीर मुघल सल्तनतीचा चौथा शहेनशहा. प्रचंड विस्तारलेल्या सल्तनतीचा आणि कल्पनातील संपत्तीने भरून ओसंडणार्या खजिन्यांचा सर्वेसर्वा.
मुघल सल्तनतीच्या विकासाच्या काळातच पेरली गेलेली भऊबंदकीची आणि सत्ताकांक्षेची बीज जहांगीरच्या काळात अधिकाधिक फोफावू लागली. सत्तेच्या हव्यासान पछाडलेल्या त्याच्या शाहजाद्यांमध्ये एकमेकांना आपल्या मार्गातून दूर करून सल्तनतीचा वारस होण्याची क्रूर स्पर्धा सुरू झाली. भयंकर युध्दे, जीवघेणे डावपेच, रक्तपिपासू षडयंत्रे यांपैकी कोणताही मार्ग त्यांना वर्ज्य नव्हता आणि ही महत्त्वाकांक्षा सहजासहजी संपणारी नव्हती. जहांगीरचे फक्त दोनच कच्चे दिवे. पहिला म्हणजे त्याची मद्य आणि अफूविषयीची टोकाची व्यसनाधीनता आणि दुसरा म्हणजे अतिशय थंड डोक्याने त्याच्या या दुर्बलतेचा गैरफायदा घेऊन सल्तनतीची सूत्रे आपल्या हाती ठेवणार्या त्याच्या पत्नीवरचे नेहरून्निसावरचे त्याचे अंध प्रेम, या सर्व पार्शभूमीवर आपल्यासमोर जहांगीरची कारकीर्द उलगडत जाते. भयंकर युध्दे, सौंदर्यासक्ती, राजकीय महत्त्वाकांक्षा, सत्तापिपासूपणा, नाजूक मानवी भावभावना, राजकीय महत्त्वाकांक्षा, सत्तापिपासूपणा, नाजूक मानवी भावभावना, राजकीय पटलावरच्या नातेसंबंधांमधील ताणतणाव अशा कित्येकदा परस्परविरोधी वाटणार्या कंगोर्यांना स्पर्श करत एखाद्या महाकाव्याने आकार घेत जावा, तशीच ही कादंबरी आपला भव्य पट वेगवान पध्दतीने आपल्यासमोर सादर करते.
ISBN No. | :9788195606306 |
Author | :Alex Rutherford |
Publisher | :Scion Publications Pvt Ltd |
Translator | :meena shete sambhu |
Binding | :paperbag |
Pages | :532 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |