Pyar Jindagi Hai ( प्यार जिंदगी है )
Pyar Jindagi Hai ( प्यार जिंदगी है )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
नायक-नायिका, खलनायक हा एक पारंपारिक भारतीय फॉर्म्युला असला तरी प्रेमपटांना अर्थाताच रोमॅंटिक चित्रपटांना प्रेक्षकांची कायमच खास पसंती मिळाली आहे. या प्रेमपटांचं एक विशिष्ट्य स्थानही राहिलेलं आहे. इतकंच नाहीतर रोमॅंटिक चित्रपटांना अन्य विविध विषयाच्या चित्रपटांपेक्षा नेहमीच रिपिट व्हॅल्यू - पुन:प्रत्यय मूल्य राहिलं आहे राजेंद्र कुमार, राजेश खन्ना, सलमान खान, शाहरूख खान आदी अभिनेते आपल्या रोमॅंटिक हिरोच्या प्रतिमेमुळे प्रेक्षकांच्या हृदयावर मनोराज्य करत आलेले आहेत. प्रत्येक माणूस हा प्रेमाचा भुकेला आहे, कुणीतरी आपल्यावर प्रेम करावं ही भावना प्रत्येकामध्ये असते. परंतु आयुष्यात प्रत्येकालाच प्रेम मिळतं, मिळालं तर ते आयुष्यभर टिकतं असंही नाही. मात्र रोमॅंटिक चित्रपट हे आयुष्यात प्रेम न मिळालेल्या, प्रेमवंचित प्रेक्षकांवरदेखील प्रेमाची फुंकर घालतात आणि ज्यांना प्रेम मिळालं आहे त्यांना अधिक सुखावह भावना देऊन जातात. याच प्रेमाचे विविध पैलू आहेत. विविध रंग आणि ढंगही आहेत. अवखळपणा, निस्वार्थीपणा, बंडखोरी, त्याग, प्रगल्भता, आदर, सामंजस्य, संयम, तडजोड...
ISBN No. | :9788195856107 |
Author | :Anita Padhye |
Publisher | :Devpriya Publications |
Binding | :Paperback |
Pages | :327 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |