Lords Of The Deccan ( लॉर्डस ऑफ द डेक्कन )
Lords Of The Deccan ( लॉर्डस ऑफ द डेक्कन )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अनेक शतक दक्षिण भारताला आकार देणार्या चालुक्य या राजघराण्याच्या जन्माचा साक्षीदार होण्यासाठी लेखक आपल्याला काळाच्या प्रवाहात मागे नेतात. दख्खनच्या माध्यमातून हिंदू धर्म तोपर्यंत स्वत:ला प्रस्थापित करत होता. त्या वेळी दख्खनमध्ये मंदिरांचा अभाव होता. त्यानंतरच्या पाचशेहून जास्त वर्षांच्या कालावधीत या द्वीपकल्पाचा कायापालट झाला. मध्ययुगीन भारतातील बलाढ्य साम्राज्य कशा प्रकारे उदयास आली, तसचं मंदिरांच्या बांधकामांना आणि भाषेच्या वापराला कशा प्रकारे राजकीय साधन म्हणून वापरण्यात आलं, हे लेखकांनी अत्यंत स्पष्ट आणि आकर्षक तपशिलांसह स्पष्ट करतात. जैन आणि बौध्द, शैव आणि वैष्णव यांच्या धार्मिक संघर्षात राजे कशा प्रकारे गुंतले होते, राजांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांहून आणि प्रजेहून उच्च ठरवण्यासाठी कशा प्रकारे जरब निर्माण करणार्या कर्मकांडांचा वापर करून घेण्यात आला, तेही ते स्पष्टपणे दाखवून देतात. हे करत असतानाच ते मध्ययुगीन भारतीय राजांचा, व्यापार्यांचा आणि सर्वसामान्य लोकांचा अस्पष्ट आकृत्यांपासून गुंतागुंतीच्या, जिवंत लोकांमध्ये कायापालट घडवून आणतात. लेखक आपल्याला चालुक्य, पल्लव, राष्ट्रकुट आणि चोल राजघराण्यांच्या प्रभावी राज्यकर्त्यांच्या मनाच्या थेट गाभार्यापर्यंत घेऊन जातात. त्यांना आणि त्यांच्या जगाला ते माणुसकीनं, मार्दवानं आणि सखोलतेने जिवंत करतात.
ISBN No. | :9788195978458 |
Author | :Aniruddha Kanisetti |
Publisher | :Madhushree Publication |
Binding | :Paperback |
Pages | :416 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |