akshardhara
Os Nila Ekant ( ओस निळा एकांत )
Os Nila Ekant ( ओस निळा एकांत )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सावगावे, सारनाथ, सातकरनी, कौलगेकर इत्यादी पात्रांच्या जगण्याच्या परस्परांना छेदणार्या कथारेषा आणि त्यांच्या परस्परभिन्न दृष्टिकोणांचा कोलाज यांतून एका सामाजिक - सांस्कृतिक अवस्थेचे चित्र उभे राहते. कोणतीही खोली नसलेल्या, पृष्ठस्तरावर तरंगणार्या तात्विक चर्चा आणि प्रत्यक्षातल्या दांभिक, भ्रष्ट व्यवहाराने जगण्याला आलेली सर्वंकष ओसाडी हे कादंबरीचे मुख्य विषयद्रव्य आहे. इथे अर्थपूर्णतेच्या शोधापेक्षा अर्थसत्तेच्या वाटा चोरवाटा शोधणेच महत्त्वाचे ठरते. समष्टीकडून निळ्या एकान्ताकडे वळताना अन्याय्य व्यवस्थेविषयीची संवेदनशीलता पूर्णपणे अदृश्य झाली आहे. तात्कालिक उपभोगाला, अनैतिक विनिमयाला अधिमान्यता देणार्या समकाळाने आधुनिकतेच्या, जातिअंताच्या आणि समतेच्या कथनाला दिलेले हे आव्हान आहे.
ISBN No. | :9788196035129 |
Author | :G K Ainapure |
Publisher | :Shabd Publication |
Binding | :Hard Bound |
Pages | :340 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

