akshardhara
Valsara ( वाळसरा )
Valsara ( वाळसरा )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आपला काळ आणि आपला भवताल यातले आशयद्रव्य घेऊनच लेखकाला रचनेचे शिल्प साकारावे लागते. ज्या भूमीवर आपण उभे आहोत तेथून प्रश्नांचे असंख्य भुंगे निघत आहेत याची जाणीव एक लेखक म्हणून त्याला नेहमीच अस्वस्थ करते. अशा सार्या वास्तवाचा पट भोवती असतो आणि त्याचा एक अदृष्य दाबही मनावर असतो. जे भोवतीचे वास्तव आहे ते अगदी जसेच्या तसे ‘कार्बनकॉपी’ प्रमाणे उतरवता येत नाही. या वास्त्ववाचा अन्वय लावण्याची लेखकाची स्वत:ची एक रीत असते. वास्तवाच्या पटलावर टोचणारे, आतून जखमी करणारी जे असते ते त्याचा सदैव पाठलाग करते. रोखठोक, जाडेभरडे असे वास्तव शब्दात उभे करताना असंख्य तपशील असतात. या तपशिलांच्या विणकामात काही धागे आंतरिक करूणेचीही असतात... किंबहुना तेच महत्त्वाचे असतात.
ISBN No. | :9788196035174 |
Author | :Asaram Lomte |
Publisher | :Shabd Publication |
Binding | :Paperback |
Pages | :169 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

