akshardhara
Tumachi Amachi May ( तुमची आमची माय )
Tumachi Amachi May ( तुमची आमची माय )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
एका खेड्यातली खात्यापित्या घरातील मुलगी विवाहानंतर सामान्य कुटुंबात येते . ज्या घरात खाण्यापिण्याचे वांधे असतात आणि घराला दाराच्या ऐवजी झोपाटा असतो ,अशा घराला ती आपल्या अंगच्या कर्तृत्वानं आणि कर्तृत्वान नवऱ्याच्या साहाय्यानं गरिबीच्या खातेऱ्यातून बाहेर काढते . देर ,भाये ,नंदा ,जावा यांचं मदतीनं सहा एकर जमिनीची एकशे सहा एकर जमीन करते . सगळ्यांना वाटतं ,तिच्या पायात लक्ष्मी आहे . खरंतर तिच्या मनगटात कर्तृत्व होतं आणि मनात अदम्य विश्वास होता . देवावर तर तिचा विश्वास होताच .
देरभायांपासून वेगळं निघाल्यावर ती आपल्या मुलांना शिकवण्याची जिद्द धरते . एकाला कवी -लेखक ,तर एकाला शास्त्रज्ञ बनवते . आपल्या चारही लेकी खात्यापित्या घरी पडाव्यात अशी व्यवस्था करते . सगळ्या लेकी ,सुनांची पंचवीसके बाळंतपण करून सगळी सांसारिक घेऊन नव्या विश्वात प्रवेश करते . आता कुणा एकाची आई न राहता ती विश्वाची आई होते . एक अध्यात्मिक उंची गाठते .
अशा आईच्या भोवतीच्या वीस माणसांनी दाखवलेले तिच्या आयुष्याचे हे विविध कंगोरे .खऱ्या अर्थाने आजची मदर इंडिया म्हणता येईल अशा प्रातिनिधिक भारतीय स्त्रीचं हे समग्र दर्शन .
| ISBN No. | :9788196171001 |
| Author | :Indrajit Bhalerao |
| Publisher | :Aditya Prakashan |
| Binding | :Paperback |
| Pages | :220 |
| Language | :Marathi |
| Edition | :2023 |
