Pauskal (पाऊसकाळ)
Pauskal (पाऊसकाळ)
Low stock: 5 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पाऊसकाळ ही लेखकांची पहिलीच कादंबरी. महापुरात पूर्णपणे उदध्वस्त झालेल्या गावाची कहाणी या कादंबरीत येते. घर, शेत, जमीन-जुमला, जनावरे पाण्याखाली गेल्यानंतर दुसर्या गावाच्या आश्रयास गेल्यावरदेखील मूळ प्रवॄत्ती कायम ठेवणारी ताठर स्वभावाची, बेरकी कलागती करणारी माणस पदोपदी कादंबरीत भेटत राहतात. सुरूवातीपासूनच कादंबरीला विलक्षण गती मिळते व एखाद्या सुसाट प्रवाहासारखी ती अखेरपर्यंत न अडखळता वेग घेते. जिथे थांबायला हवी तिथेच संपते. वातावरणात विसंगती येत नाही तशी पात्रांच्या लकबी अनावश्यकही वाटत नाहीत आणि संवादाचा अति सोसही दिसत नाही. वाचता वाचता एखादीच उपमा येते; पण ती आशय उजळवून टाकते. शब्दांचे मोजके नि नेमके उपयोजन आणि आटोपशीर पण बोलके संवाद यांमुळेही पाऊसकाळ कादंबरी एका वेगळ्याच उंचीला जाऊन पोहचते.
ISBN No. | :9789350790335 |
Author | :Vijay Jadhav |
Publisher | :Mauj Prakashan Gruha |
Binding | :paperbag |
Pages | :172 |
Language | :Marathi |
Edition | :1 |