Priya G A (प्रिय जी. ए.)
Priya G A (प्रिय जी. ए.)
Out of stock
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
...अनेकदा तर असे वाटते, की सुनीताबाईंनी अशा त-हेचे पत्रव्यवहार होता म्हणूनच जी. ए. च्या वाड्मयविचारांची आणि जीवनचिंतनाची श्रीमंती आपल्याला न्याहाळता आली. एरवी सात दरवाजांमागे स्वत:ला बंद करून घेणा-या या कलावंताचे असे तालेवार लेखन अशा विश्रब्धपणे घडते ना. याची जाणीव असल्यामुळेच सुनीताबाईंनी जी. ए. ना लिहिण्यासाठी नाना निमित्ते दिली. त्यांच्यापुढे नाना प्रश्न ठेवले. जीवनाच्या अंधा-या बाजूविषयी विलक्षण कुतूहल असणारे जी. ए. त्या प्रश्नांची निर्माण केलेल्या अंधारात कसे उतरतात, हे त्या उत्कंठेने आणि आनंदाने पाहत गेल्या. मुळात या दोघांचे मैत्र हे दोन समृद्ध आणि समानशील अशा प्रौढ स्त्री-पुरुषांमधले निर्माणक मैत्र होते. पहिल्याच पत्रातस दोघांनाही परस्परांच्या स्वतंत्र व्यक्तित्वांची जाणीव झाली होती... जी. ए. हे एक अत्यंत प्रतिभाशाली आणि अनवट जातीचे कलावंत असल्याचे सुनीताबाईंनी माहीत होतेच, पण सुनीताबाई याही केवळ पु. ल. च्या पत्नी नव्हत्या. सकस आणि समृद्ध वाचन असणा-या, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता असणा-या... त्याचबरोबर स्नेह देण्याची, लोभ करण्याची अपरंपार्त ताकदही त्यांच्या ठायी होती... तसा लोभ करण्याची ऊर्मी मनात दाबून ठेवून, विपरीत अनुभवांची वेदनाच बरोबर घेऊन चालणारा एक हळवा, मनस्वी कलावंत जी. ए. च्या रूपाने भेटला आणि सुनीताबाईंनी त्याच्यावर स्नेहाचा वर्षाव केला...
ISBN No. | :9789350911433 |
Author | :Sunita Deshpande |
Publisher | :Mauj Prakashan Gruha |
Binding | :Paperback |
Pages | :188 |
Language | :Marathi |
Edition | :2010/12 - 1st/2003 |