Vanvas (वनवास)
Vanvas (वनवास)
Share
Author:
Publisher:
Pages: 182
Edition: Latest
Binding: Peparback
Language:Marathi
Translator:
पौगंडदशेतल्या छोट्या छोट्या अनुभवांच्या मार्मिक तपशिलानं जिवंत केलेल्या ह्या कथा आहेत. बाळगोपाळांच्या चिमुकल्या दुनियेचं प्रकाशने घडवलेलं हे दर्शन अपूर्व आहे. पौगंडदशा ओलांडताना यौवनाच्या सुगंधी झुळुका अंगावरून जाताना अस्वस्थ करून टाकणारा हा कालखंड. कोणीतरी ह्या वयाच्या अवस्थेला ‘emotional sea-sickness' म्हटलं आहे. ह्या अवस्थेचं इतक्या सहजतेनं दर्शन घडवणारं लेखन माझ्या तरी वाचनात यापूर्वी आलेलं नाही. लंप्याची ही कथा त्या वयाचा मॅडनेस अंगात मुरवून लिहावी लागते. त्या लेखनात प्रकाश यशस्वी झाला आहे. लंप्याच्या भाषेत सांगायचं म्हणजे, ‘एकदा नाही, दोनदा नाही तर अठ्ठावीसशे तीस वेळा जरी ह्या कथा मॅडसारख्या वाचल्या’ तरी त्या ताज्याच वाटतील. एक निराळ्याच शैलीचा आणि वाचकाशी चट्कन संवाद साधून त्यालाही लंप्याच्या वयाचा करून टाकणारा कथासंग्रह मराठीत येतो आहे ह्या आनंदात मी आहे. प्रकाशला धन्यवाद आणि त्याचं अभिनंदन. - पु. ल. देशपांडे
ISBN No. | :9789350911990 |
Author | :Prakash Narayan Sant |
Publisher | :Mauj Prakashan Gruha |
Binding | :Paper Bag |
Pages | :182 |
Language | :Marathi |
Edition | :2011/05/15 - 12th/1994 |