akshardhara
Parisparsha (परीसस्पर्श)
Parisparsha (परीसस्पर्श)
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
त्यांच्यातल्या एकाने बजाला सांगितल अरे शेटजींना विचार ना काय हव ते कामाची माणस ते मघापासून बसली आहेत ना पण बजा काही बोलायच्या आधी मीच म्हणालो, मळ्यावर दोन रात्री लागोपाठ काय झाल सार्या गावाला माहीत आहे. माझी दोन जनावर दगावली, पांडुरंगचाही बळी गेला. आता बजाला विचारायला आलोय. का रे बाबा, कोण कोपल माझ्यावर? कोणी करणी केली का? कोणी वाइटावर आहे क? आमच्या घरच्या कोणाकडून काही आगळीक झाली का? काही कोणाची शांत करायला हवी का? काय भानगड आहे पाहा तरी बजा ! आता सगळ्यांच्या नजरा बजाकडे वळल्या. कारण सांगता येत नाही पण बजा जरासा घुटमळत होता. खरोखरच त्याला यातल काही कळत का तो आपला चार पैशांसाठी लोकांना बनवतो मला माहीत नाही. अशा काही शक्ती असतीलच तर त्या इतक्या भलत्याच माणसांच्या अंगी दिसतात की सांगता येत नाही पोलीस काहीही शोध लावू शकले नव्हते. इतर कोणताही उपाय करायला मी तयार होतो. शेवटी बजा म्हणाला, शेटजी, आज संध्याकाळी मळ्यावर येतो. जागेवरच पाहतो.
| ISBN No. | :9789352202836 |
| Author | :Narayan Dharap |
| Publisher | :Saket Prakashan Pvt Ltd |
| Binding | :Paperback |
| Pages | :166 |
| Language | :Marathi |
| Edition | :2021 |
