Vishari Varasa ( विषारी वारसा )
Vishari Varasa ( विषारी वारसा )
Out of stock
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पाण्याची फेसळणारी कड जवळ जवळ येत होती आणि तिला हलताच येत नव्हत. पायच नाही, तर सार शरीरच कसल्या तरी चिकट द्रावात रूतून बसल होत. तिथून सुटण्यासाठी तिने आटापिटा केल्याची एक स्मृती मनात होती, पण आता अवयवांत त्राणच उरल नव्हत. पाण्याची कड एखाद्या अधाशी जनावरासारखी सारखी पुढे सरकत होती. लाटेवरचा फेस वासलेल्या जबड्यातल्या दातांसारखा दिसत होता. पाणी तिच्यापर्यंत पोचल. शरीराला एक मखमली स्पर्श करून मागे सरल हा गोंजारणारा मखमली स्पर्श विषारी होता. शरीरातल सर्व बळ एकवटून तिने एक उसळी मारली. पण व्यर्थ एखादा इंचच ती हलली असेल पाणी पुन्हा आल त्याला घाई नव्हती. ते आपला वेळ घेत तिला सावकाश मारणार होत... त्याच्या तावडीतून ती आता सुटत नव्हती... मऊसर, गोरेगार, रेशमी हातांनी ते तिला मारणार होत... त्याचे चमकणारे पदरामागून पदर तिच्यावरून जातील... नाक, तोंड, डोळे, कान सर्वांवाटे ते शरीरात शिरेल.. शरीरातला कानाकोपरा त्या फेसाळणार्या पाण्याने भरून जाईल.. ती किंचाळली... पण पाण्याच्या गर्जनेत तो क्षीण आवाज केव्हाच विरून गेला... पाणी तिच्या शरीरावरून पुढे गेल होत छातीपर्यंत आल गळ्यापर्यंत आल तोंडापर्यंत आल... नको...नको...आई!...
ISBN No. | :9789352203628 |
Author | :Narayan Dharap |
Publisher | :Saket Prakashan Pvt Ltd |
Binding | :paperbag |
Pages | :120 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |