akshardhara
Apali Pruthvi ( आपली पृथ्वी )
Apali Pruthvi ( आपली पृथ्वी )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ज्वालामुखीतून शिलारसाच्या गुणधर्मानुसार काही वेळा अगदी बारीक कण उंच उफाळतात. हेही तप्त असतात. त्यांना ज्वालामुखीय राख असं म्हटलं जातं काही वेळा शिलारसाचे गोळे हवेत गेल्यावर थंड होऊन तप्त शिळेच्या रुपात खाली येतात. याप्रमाणे स्फोटातून बाहेर पडून उंचावर जाऊन दूरवर पसरणार्या पदार्थांना स्फोट शकली पदार्थ म्हणतात. या पदार्थांचा अभ्यास करून शिलारसाचं स्वरूप कळू शकतं. जेव्हा शिलारस भूपृष्ठाखालीच असतो तेव्हा त्याला मॅग्मा असं म्हटल जातं. यात प्रवाही शिलारसाबरोबर अनेक प्लवनशील पदार्थही असतात. पाण्याची वाफ, सल्फर-डाय-ऑक्साईड वायू, काही वेळा पार्याची संयुगं असे घटक यात असतात; पण ज्यावेळी या शिलारसाला भूपृष्ठावर यायला वाव मिळतो तेव्हा हे असे घटक हवेत मिसळून जातात आणि त्यांच्याशिवाय जो शिलारस उरतो त्याला लाव्हा अस्म म्हटलं जातं.
ISBN No. | :9789352203901 |
Author | :Niranjan Ghate |
Publisher | :Saket Prakashan Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :144 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

