akshardhara
My Name Is Paravana ( माय नेम इज परवाना )
My Name Is Paravana ( माय नेम इज परवाना )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
परवानाच पुढ काय झाल ?
तालिबान्यांचा पराभव झाल्यानंतर अफगाणिस्तानात अमेरिकन सैनिकांनी एका अफगाण मुलीला अतक करून ताब्यात घेतल आहे. पण आहे कोण ती मुलगी ? बॉम्बहल्ल्यात उदध्वस्त झालेल्या एका शाळेचे ढिगारे उपसत का ती तिथे वेड्यासारखी एकटी फिरत होती ? ती दहशतवादी असेल का ? अमेरिकन सैन्याच्या तळावर बंदिवासात टाकलेल्या त्या अफगाण मुलीची उलटतपासणी सुरु होते. पण ती एकाही प्रश्नाच उत्तर देत नाही. ऒठ घट्ट मिटून गप्प राहते. छळ होतो, मारहाण होते; तेरी ती बघत नाही. कोण असेल ती मुलगी ? एकच सुगावा असतो अमेरिकन लष्कराच्या हाती: त्या मुलीकडे सापडलेली खांद्यावर लटकवायची एक कापडी, फाटकी मळलेली पिशवी आणि त्यातले काही कागद. त्यावर काही नाव लिहिलेली शौझिया, नूरिया, लैला, हसन, आसीफ.. आणि परवाना. खूप काळ प्रतीक्षेत असलेला हा द ब्रेडविनर या पुस्तकमालिकेचा पुढचा भाग. आता परवान पंधरा वर्षांची झाली आहे. अमेरिकन सैन्याच्या ताब्यात असताना तिला तिच्या आयुष्यातली चार वर्ष आठवतात. अम्मी आणि बहिणींना भेटल्यावर एका खेडेगावात त्यांच कुटुंब पुन्हा जगू लागत. आणि जिवापाड प्रयत्न करून अम्मी तिच स्वप्न साकार करते: अफगाण मुलींसाठी शाळा सुरू करण्याच स्वप्न. शाळा सुरू होते आणि परवानाला तिच्या स्वप्नातल, हवहवस आयुष्य पुन्हा मिळत पण हा अफगाणिस्तान आहे. युध्द अजून संपलेल नाही आणि मुलींच शिक्षण, मुलींच स्वातंत्र्य ही या देशात संशयान, रागान पाहण्याची गोष्ट आहे. याचाच अर्थ परवाना आणि तिच्या कुटुंबाच्या डोक्यावर लटकती तलवार अजूनही तशीच आहे.
ISBN No. | :9789353172398 |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Aparna Velanakar |
Binding | :paperbag |
Pages | :192 |
Language | :Marathi |
Edition | :2019 |