Dharmayuddha (धर्मयुध्द)
Dharmayuddha (धर्मयुध्द)
Low stock: 2 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
महाभारत हे महाकव्य म्हणजे भारतीय जनमानसात रुजलेले एक महामिथक आहे. महाभारतकथा माहीत नाही किंवा आवडत नाही असा भारतील माणूस सापडणे कठीण. मानवी भावनांचा, भावसंघर्षाचा आणि तज्जन्य नाट्याचा जो असामान्य महागोफ या महाकाव्यात विणला गेला आहे त्याला जागतिक वाड्मयात तोड नाही. महाभारतकथेच्या या असामान्य वैशिष्ट्यांमुळे ती वाचकांना आणि कलावंतांना पुन: पुन्हा आवाहन करत राहते. महाभारतकथेतील ज्या अनेक व्यक्तिरेखा भारतीय जनमानसात खोलवर रूतून बसल्या आहेत. त्यामध्ये कर्ण ही एक प्रमुख व्यक्तिरेखा आहे. कर्नकथेला लवचकुंडलांची पुट चढवण्यात आली असली तरी त्यापलीकडे उभा असलेला आणि तत्कालीन वर्णव्यवस्थेशी संघर्ष देत आपली योग्यता सिध्द करणारा कर्ण सतत आपले लक्ष वेधून घेत राहतो. त्याच्या व्यक्तिरेखेला असलेला कारूण्याचे हेच गडदगहिरे परिणाम कलाव्ण्तांना आकर्षित करत असावे. योग्यता असूनही पावलोपवली अवमानित झालेला, डावलला गेलेला कर्ण हे तेजोभंगाचे जिव्ण्त प्रतिक आहे. भोवतालच्या विषम सामाजिक वातावरणात कर्णाची वेदना आजही तेवढ्याच तीव्रपणे सामोरी येत राहते. आज आधुनिक काळात जगणार्या माणसालाही कर्ण आपला जिवलग सखा वाटतो तो यामुळेच.
ISBN No. | :9789353173135 |
Author | :Dr Ravindra Thakur |
Binding | :Paperback |
Pages | :376 |
Language | :Marathi |
Edition | :2019 |