akshardhara
Lohgadha ( लोहगढ )
Lohgadha ( लोहगढ )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
लखी राय बणजारा यांचे मानवतेसाठी योगदान व बलीदान.
भारतीय उपमहाद्वीपामध्ये भौगोलिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक संरक्षण, व व्यापारी विकासाचे कार्य बणजारांनी केलेले आहे. इतिहासाची पाने चाळतांना प्रामुख्याने बणजारा योध्दांची नावे दिसुन येत नाही हे एक आश्चर्यच आहे. मात्र या ग्रंथात लेखकाने वास्तवतेचा इतिहास जगासमोर आणला आहे. ७००० एकर क्षेत्रावर जगातील सर्वात मोठा अदभुत लोहगढ किल्ला भाई लखी राय बणजारा यांनी बांधलेला आहे. भाई लखी राय बणजारा हे १६ व्या शतकात अशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. आजही त्यांनी निर्मान केलेले तलाव, विहरी, किल्ले, इमारती, व्यापारी रस्ते इत्यादी ४०० वर्षानंतर सुध्दा उत्तम अवस्थेत आहेत.
प्रामुख्याने इतिहासात अजरामर असलेली नावे भाई लखी राय बणजारा, बल्लुराव बिंजरावत, मख्खन शहा लभाणा, भाई मनीसिंग पवार इत्यादी होत. भाई लखी राय बणजारा यांच्या कुटूंबातील व नातेवाईकांपैकी तब्बल १५० शूरवीर योध्दयांनी मानवतेच्या कल्याणासाठी बलीदान दिलेले आहे. भाई नानू शहा बिंजरावत हे शिख इतिहासातील पहिले बलिदान होते, तर मुघलांची अराजक सत्ता मुळासकट उपटून काढण्यासाठी इतिहासातील सर्वात वयोवृध्द भाई नागीया सिंगाने वयाच्या ९५ व्या वर्षी घोड्यावरून लढतांना बलिदान दिले. महानायक बंदासिंग बहादुरच्या बलीदानाने तर देशात मानवता सहिष्णुता व समानतेच्या वटवृक्षांची बिजेच रोवली गेली.
ISBN No. | :9789353471309 |
Author | :Harjindar Sing Dilgir |
Publisher | :Shubham Sahitya |
Translator | :Jayram Sitaram Pawar |
Binding | :Hard Bound |
Pages | :239 |
Language | :Marathi |
Edition | :2019 |