Skip to product information
1 of 2

akshardhara

Gajhaljit ( गझलजीत )

Gajhaljit ( गझलजीत )

Regular price Rs.288.00
Regular price Rs.320.00 Sale price Rs.288.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

हिर्‍याचा व्यापारी आपल्या ग्राहकाला एखादा मौल्यवान हिरा ज्या नाजुकतेने, नवलाईने आणि प्रेमाने दाखवतो, त्याच पध्दतीने जगजीत सिंग आपल्या गझलचे शब्द रसिक श्रोत्यांसमोर गाऊन पेश करत असत. जगजीत सिंग यांची गझल ऎकत असताना, ऎकणार्‍यास त्याचा दिवसभराचा ताणतणाव निघून गेल्यासारखे वाटते, मन प्रसन्न होते. प्रत्येकाला ही गझल म्हणजे जणू आपलीच कहाणी आहे, आपणच जणू गात आहोत की काय? असे वाटावे, इतकी ती श्रोत्यांना भावते. त्यांच्या अद्वितीय गायनशैलीमुळे व आवाजामुळे, सर्वसामान्य रसिक तर सुखावलाच, परंतु या देशातील हिंदी सिनेसंगीत दुनियासुध्दा दणाणून गेली. जगजीत सिंग यांचे आयुष्य असह्य दु:ख प्रसंगांनी भरलेले होते. त्यांना आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी घ्यावे लागलेले कणखर निर्णय, अपार मेहनत, अपयशाने न खचता कार्य करीत राहण्याचे कसब व मरणप्राय दु:खातही स्वत:ला सावरण्याची हिंमत, वाचकांना प्रेरणादायी ठरतील याचा मला विश्वास आहे. माझ्यासारख्या असंख्य रसिकांची मने जिंकणार्‍या या कलाकाराला जगजीत हे नाव जसे सार्थ आहे. तसेच आपल्या आगळ्यावेगळ्या गायनशैलीने जगभरातील रसिकांना गझलकडे आकर्षित करून, गझलवर नितांत प्रेम करायला भाग पाडणार्‍या या कलाकाराला गझलजीत हे नाव देखील तितकेच संयुक्तिकाणि समर्पक वाटते.

ISBN No. :9789355938398
Author :Vaibhavkumar Shinde
Publisher :Roar Publication
Binding :paperbag
Pages :249
Language :Marathi
Edition :2022
View full details