Ichalkaranji ( इचलकरंजी )
Ichalkaranji ( इचलकरंजी )
Low stock: 2 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
एखाद्या गावाचा स्थानिक इतिहास ही काही फार नवी कल्पना नाही. अनेक गावे प्राचीन काळापासून आपले सांस्कृतिक व ऎतिहासिक अवशेष जपत वाढत असतात. होणारे बदल पचवत पुढे वाटचाल करत असतात. काही गावांना मोठ्या व्यक्तींच्या असामान्य कर्तबगारीचा आधार लाभतो तर काही गावांच्या खाणाखुणा काळाच्या तडाख्याने जमीनदोस्त होता. कसाही इतिहास असला तरी गावाच्या रंगरूपात काय काय व कसे कसे बदल होत गेले त्याचा इतिहास रंजक ठरू शकतो.
हा इचलकरंजी गावाचा इतिहास आहे. हा इतिहास फार प्राचीन नाही, त्याला ठार रोमहर्षक कहाण्यांचे पदर नाहीत. पण तरीही आपल्या गावाचा इतिहास जाणून घेण्याची इच्छा असणार्या प्रत्येकाला तो अभिमानास्पद वाटेल यात शंका नाही. हा इतिहास शब्दबध्द करताना अनेक दगड उलटेपालटे करावे लागले, अनेकांच्या बिजलेल्या आठवणींचे झरे मोकळे करावे लागले. या कामात प्रकर्षाने जाणवली ती गोष्ट म्हणजे आपली इतिहासाची पाने जपून ठेवण्याबद्दलची सार्वत्रिक अनास्था. ज्यांना या इतिहासाचा वारसा मिळाला त्यांनीसुध्दा तो सांभाळण्याबाबत अक्षम्य दुर्लक्ष करावे ही बाब खेदजनक ह्प्ती. हे विसरलेले धागे जुळवण्याचे काम जी मंडळी करू शकली असती त्यांची अनास्था वेदनादायक होती. त्यातूनही जे हाती लागले ते मात्र जपून ठेवावे इतके मनोज्ञ आहे.
ISBN No. | :9789356806511 |
Author | :Bapu Tardalkar |
Publisher | :Bapu Tardalkar |
Binding | :Hard Bound |
Pages | :399 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |