Zund ( झुंड )
Zund ( झुंड )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मित्रहो, ही लढाई जिंकणं सोपं नाही. आपल्याला लढा द्यायचा आहे तो राजकारणातील दांडगा अनुभव, अलोट पैसा आणि फक्त आपणच राजकारण केलं पाहिजे अशी राक्षसी इच्छा असणार्यांविरुध्द. मी कोणाचं नाव घेणार नाही. कारण आपण व्यक्ती म्हणून कोणाचाही विरोध करत नाही. आपण विरोध करतो तो अनिष्ट आणि अतिरिक्त प्रवृत्तीचा. जगात जणू फक्त आपणच प्रत्येक गोष्टीचा ठेका घेतला आहे, ही एकमेव भावना ठासून भरलेल्यांचा. ही साखळी आपल्याला तोडायची आहे आणि तोडण्यासाठी आपल्याजवळ प्रचंड शक्ती असणारं एक शस्त्र आहे. जे इतरांजवळ नाही. ते आहे तुमच्या आमच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचं. ही आपली ताकद आहे. ती कितीही पैसा ओतला तरी कोण्या ऎर्यागैर्याला मिळू शकत नाही. ती फक्त आपलीच अमानत आहे. तिचा पुरेपुर फायदा आपल्याला घ्यायचा आहे. मला कुसुमाग्रजांच्या त्या स्फूर्तीदायी ओळी आठवतात- अनंत आमची ध्येयासक्ती। अनंत अन आशा। किनारा तुला पामराला। तर मित्रहो, चला, खांद्याला खांदा लावून शेवटपर्यंत चिवटपणे लढूया. विजय फक्त आपला आणि आपलाच आहे.
सत्ताकारणाच्या चिखलातही चिवटपणे झुंज देणार्या तरूणाची अंतर्मुख करायला लावणारी कथा....
ISBN No. | :9789357200004 |
Author | :Babarao Musale |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :444 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |