Gone Girl ( गॉन गर्ल )
Gone Girl ( गॉन गर्ल )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
२०१२ मध्ये प्रकाशित झालेलं ‘गॉन गर्ल’ हे गिलियन फ्लिन या लेखिकेचं पुस्तक चांगलंच गाजलं. या कादंबरीतील मुख्य रहस्य हे त्याचा नायक निक् आणि त्याच्या पत्नीच्या बेपत्ता होण्यात असणारा सहभाग यातून निर्माण होतं. लग्नाच्या पाचव्या वाढदिवशी निक्ची पत्नी बेपत्ता होते. इथून कथेला सुरुवात होते. अॅमीच्या जाण्याचा निक् वर दिसून येणारा परिणाम हा पोलिसांना निक्वर संशय घ्यायला प्रवृत्त करतो. निक्चा दृष्टिकोन आणि अॅमीची डायरी यातून एक परस्परविरोधी चित्र निर्माण होतं. निक्च्या मते अॅमी ही एक अंतर्मुख, हट्टी, समाजात फटकून वागणारी आणि अतिरेकी काटेकोर अशी बाई आहे, तर अॅमीच्या डायरीतून दिसणारं निक्चं चित्र हे आपलं ते खरं म्हणणारा, मूडी, आळशी आणि जरासा धोकादायक नवरा असं आहे. एकूणच लग्नाबद्दलची, संसाराबद्दलची त्यांची मतं आणि अपेक्षा परस्परविरोधी आहेत. जागतिक मंदीच्या लाटेमध्ये नोकरी गमावलेले निक् आणि अॅमी निक्च्या आईच्या आजारपणात मदत करायला म्हणून निक्च्या मिसुरीमधल्या गावी येतात आणि इथून त्यांच्या संसाराच्या घसरणीला सुरुवात होते.
ISBN No. | :9789357200189 |
Author | :Gillian Flynn |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Sai Sane |
Binding | :paperback |
Pages | :511 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |