Sialkot Gatha ( सियालकोट गाथा
Sialkot Gatha ( सियालकोट गाथा
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
प्रश्न पैशाचा असतो तेव्हा सगळ्यांचा धर्म एकच असतो.’
अरविंद आणि अरबाज या सारख्यासारख्याच दोन व्यापार्यांच्या आयुष्यातील चढौतार. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात वरचढ ठरण्यासाठी ते जगातला प्रत्येक नियम मोडत भयावह आणि घातक योजना आखतात. आणि त्यांची इच्छा नसूनही त्यांची आयुष्यं त्यांना पुन्हापुन्हा एकमेकांसमोर आणून उभी करतात. आपण जे मिळवण्यासाठी आणि ज्यासाठी भांडत आहोत तीच गोष्ट एक रहस्य जाणून घेण्यातील अडथळा आहे याची दोघांनाही कल्पना नाही... काळाच्या पडद्याआड गेलेलं एक प्राचीन रहस्य... आणि तरीही, या सगळ्याच्या तळाशी आहे एक हळुवारपणा...
आणि कारूण्य... आणि रक्त...आणि अत्यानंदाचे काही दुर्मिळ क्षण. एकच माणूस सज्जन आणि दुर्जनही असू शकतो का? जेता आणि जितही असू शकतो का? काळा आणि पांढराही असू शकतो का?
अत्यंत कुशलतेने कथेचे धागे गुंफणारे निष्णात कथाकार अश्विन सांघी पुन्हा एकदा भूतकाळ आणु वर्तमानाचे, वास्तव आणि कल्पनेचे, इतिहास आणि दंतकथेचे, व्यवसाय आणि राजकारणाचे, प्रेम आणि द्वेषाचे धागे एकत्र गुंफत आहेत. या चित्तथरारक गोष्टीत अनेक पातळ्यांवर घटना घडतात आणि त्या तुम्हाला उत्कंठेच्या कड्याच्या टोकावर सतत झुलवत ठेवतात. आणि तिच्या अनपेक्षित शेवटाचा तुम्ही फक्त अंदाज बांधत राहता.
ISBN No. | :9789357200288 |
Author | :Ashwin Sanghi |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Trupti Kulkarni |
Binding | :Paperback |
Pages | :459 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |