akshardhara
Godfather Of Crime ( गॉडफादर ऑफ क्राइम )
Godfather Of Crime ( गॉडफादर ऑफ क्राइम )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मी अंडरवर्ल्डची पहिली मोठी स्टोरी केली होती १९९० च्या दशकाच्या प्रारंभी. मी गवळीची मुलाखत घेतली होती तेव्हा मला गॅगस्टरशी कसं वागायचं किंवा कोणते प्रोटोकॉल पाळायचे याची कल्पना नव्हती; पण मी दाऊद इब्राहिमला भेटले त्यावेळेपर्यंत मी अंडरवर्ल्ड रिपोर्टर म्हणून चांगली मुरले होते. या मुलाखतींदरम्यान मी या अट्ट्ल अपराध्यांची भावनाशील बाजूही पाहिली आहे. विशेषत:, त्यांच्या मुंबईतल्या सुरूवातीच्या दिवसांबद्दल आणि त्यांच्या कुटुंबाबद्दलच्या आठवणी सांगताना. आपल्या मुलाबाळांच्या आणि नातवंडांच्या सुरक्षिततेबद्दल व भवितव्याबद्दल बोलताना त्यांचे आवाज मृदू झालेले ऎकले आहेत. काहींनी त्यांची मुले कशी डॉक्टर, इंजिनिअर, एमबीए, फॅशन डिझायनर बनली आहेत आणि कायदेशीर व्यवसाय-उद्योग करत आहेत हे अभिमानाने सांगितलं. त्यांनी मला त्यांची रॉमॅन्टिक बाजू पाहायची परवानगी दिली तेव्हा ते हसले, त्यांच्या चेहर्यावर प्रसन्नता पसरली. पैशाने विकत घेता येऊ शकेल अशी प्रत्येक गोष्ट त्यांच्याजवळ असूनही आणि दहशत निर्माण करण्याच्या क्षमतेमुळे ते सामर्थ्याचा आनंद घेत असूनही, मी त्यांच्यामध्ये सामाजिक प्रतिष्ठा व स्वीकारर्हतेची तीव्र आस पाहिली त्यांच्यापैकी कुणालाही आपल्या नातवंडांनी आपल्याला दहशतवादी किंवा गॅंगस्टर म्हणून ओळखावं असं वाटत नव्हतं.
ISBN No. | :9789357200370 |
Author | :Sheela Raval |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :270 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

