Garbhasanskar (गर्भसंस्कार )
Garbhasanskar (गर्भसंस्कार )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पुस्तकाविषयी... बाळ हवे असे ठरल्यापासून गर्भधारणा, प्रसूती, बाळाचा जन्म होईपर्यंत, बाळ २ वर्षांचे होईपर्यंत माहिती असायला हवे ते सर्व काही! वाचा डॉ. श्री बालाजी तांबे यांच्या अनुभवसिद्ध शब्दात! १ पारंपारिक भारतीय संस्कार व थेरपी २ गर्भधारणेची पूर्वतयारी ३ निरोगी बालकासाठी पूर्वतयारी ४ आयुर्वेदिक रसायनांची योजना ५ स्वास्थ्यसंगीत ६ योगासने ७ आहारयोजना ८ गरोदरपणातील दैनंदिन आचरण ९ बालकाचे संगोपन १० प्रसवानंतर पूर्वस्थितीत येण्यासाठी आहार व उपचार ...आणखीही खूप काही डॉ. श्री. बालाजी तांबे यांचे आयुर्वेद क्षेत्रातले योगदान अतुलनीय आहे. चार दशकांपेक्षाही अधिक काळाच्या आयुर्वेद साधनेतून त्यांनी आयुर्वेदिक उपचार आणि ओषधे बनवण्याला एक वेगळीच दिशा दिली. ज्याचा फायदा आजपर्यंत देश-परदेशातील असंख्य लोकांनी घेतला आहे. त्यांनी स्थापन केलेली भारतातील तसेच परदेशातील आयुर्वेद केंद्रे आंतरराष्ट्रीय ख्यातीची आहेत. अध्यात्मिक मार्गदर्शक म्हणूनही त्यांचा जगभरात नावलौकिक आहे. ज्या प्रमाणे घरातील अनुभवी व्यक्ती परंपरेने चालत आलेल्या ज्ञानाच्या आधारावर संपूर्ण घराला मार्गदर्शक करते, त्या प्रमाणे डॉ. श्री बालाजी तांबे यांनी ४० वर्षांच्या शास्त्रीय संशोधनातून गर्भसंस्काराची संकल्पना जक्षासमोर मांडली आहे. - डॉ. श्री. नरेंद्र जाधव (मराठी पुस्तक विमोचन) गर्भसंस्कार हा असा संस्कार आहे जो येणा-या प्रत्येक पिढीला प्रकाशाकडे घेऊन जाऊ शकेल, ज्याची आपणा सर्वांना आस आहे. डॉ. श्री बालाजी तांबे यांनी ’आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ हे पुस्तक तयार करण्याचे उत्कृष्ट काम केले आहे, त्यांनी खूप मेहनत घेतली आहे, ते खूप कार्यरत - असतात. भारतीय परंपरा, विदया यांचा प्रसार होण्यासाठी ते नेहमीच प्रयत्न करत असतात. या पुस्तक प्रकाशनाच्या दिवशी मी खरोखरच प्रसन्न आहे. - पूज्य श्री संत मुरारी बापू (गुजराती पुस्तक विमोचन) डॉ.श्री बालाजी तांबे यांनी आयुर्वेदक्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन. ’आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ हे त्यांचे पुस्तक केवळ एक पुस्तक नाही, तर प्राचीन ज्ञानाचा खजिनाच आहे. या ज्ञानाचा प्रसार केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभर व्हायला हवा -श्री अमिताभ बच्चन (इंग्रजी पुस्तक विमोचन) अमेरिकेतील ’लायब्ररी ऑफ ~कॉंग्रेस’मध्ये संदर्भग्रंथ म्हणून निवड झालेले आणि ’एशियन रिडींग रूम’ मध्ये ठेवण्यात आलेले गर्भसंस्कार विषयावरील एकमेव पुस्तक!
ISBN No. | :9789380571089 |
Author | :Dr Balaji Tambe |
Publisher | :Sakal Prakashan |
Binding | :Hard Bound |
Pages | :225 |
Language | :Marathi |
Edition | :2014/01 - 1st/2007 |