1
/
of
2
akshardhara
Brain Tonic (ब्रेन टॉनिक)
Brain Tonic (ब्रेन टॉनिक)
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
वंशवेल पुस्तकाला पूरक अशा ’ब्रेन टॉनिक’ विषयी ’वंशवेल’ पुस्तक लिहून झाल्यावर मधल्या पंधरा-वीस वर्षांत या विषयावर पाश्चात्त्य देशांत बरंच संशोधन झालं. ते सर्व पुन्हा ’वंशवेल’मध्ये घालणं शक्य नव्हतं. ’वंशवेल’चा विषय आपल्या परीनं बैठक म्हणून परिपूर्ण होता. नव्यानं मिळालेली माहिती या विषयाचा एका वेगळया त-हेनं पाठपुरावा करत असलेली आढळली. गर्भधारणेपूर्वी जवळजवळ तीन महिने पती-पत्नीनं आपलं आहारनियोजन करण अत्यंत आवश्यक आहे, असं या माहितीवरून लक्षात आलं. तसं न झाल्यास पहिले तीन महिने गर्भाला पोषणपुरवठा मिळवण्याच्या दृष्टीनं असमर्थ ठरतात व या कुपोषणाचा मुख्य परिणाम मेंदूच्या आरोग्यावर विकासावर होतो, असं हे नवीन निष्कर्ष सांगतात. पूर्ण विकसित झालेला मेंदू हा उत्तम व्यक्तिमत्त्वासाठी नव्हे, तर माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक आहे. गर्भधारणेची तीन महिने उलटून गेल्यावर पोषणाचा प्रयत्न करणं, किंवा पहिली गर्भधारणा यशस्वी पार पाडली म्हणून दुस-या गर्भधारणेचा पोषणाचा प्रयत्न करणं हे मुलाच्या मेंदूच्या विकासाच्या दॄष्टीने हानिकारक ठरू शकतं. खास करून आजकाल बदलत्या जीवन्पद्धती, बदलत्या खादयपद्धती आणि स्त्रियांच्या नोकरी करण्याच्या वेळा यांमुळे गर्भाशयात कुपोषण होण्याची शक्यता वाढते. हे आजकालच्या जमान्यात पालकांनी लक्षात घ्यावं, हेच सांगण्याची प्रस्तुत पुस्तकाचा प्रयत्न!
View full details
ISBN No. | :9789380572147 |
Author | :Dr Malati Karvarkar |
Publisher | :Menaka Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :72 |
Language | :Marathi |
Edition | :2011/07 - 1st/2005 |

