Annapurneshi Hitaguj (अन्नपूर्णेशी हितगूज)
Annapurneshi Hitaguj (अन्नपूर्णेशी हितगूज)
Low stock: 2 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अन्नपूर्णेशी हितगूज आज ओदयोगिकीकरणामुळे सामाजिक जीवन आमूलाग्र बदललं आहे. नोकरीची स्त्रियांनाही पडलेली गरज यामुळे स्वयंपाकघरात कळत नकळत फेरफायदा झाले आहेत. हे फेरफार होताना आहारशास्त्राची शास्त्रीय माहिती, पदार्थांची कारणपरंपरा आणि एकमेकांशी गुणधर्मानुसार असणारं नातं लक्षात घेणं अत्यंत जरुरीचं आहे. पाश्चत्त्य आहारशास्त्र आणि भारतीय आहारशास्त्र यातल्या नव्या-जुन्याची सांगड घालून आजच्या परिस्थितीशी जुळणा-या सोप्या अशा आहारशास्त्राची ओळख या पुस्तकात करून दिली आहे. वेळ, पैसा आणि इंधन हे सर्व वाचवून रुचकर पदार्थ बनवता येतात हे स्वानुभवानं पडताळून पाहूनच ते तुमच्यापुढे मांडले आहेत. जी अन्नपूर्णा स्वत: अर्धपोटी राहून इतरांना खायला घालते, तिलाही या पुस्तकात लेखिकेनं मार्गदर्शन केलं आहे. आजच्या शतकात आरोग्याचा संबंध अर्थशास्त्राशी लावला जातो. मनुष्यबळ ही फार मोठी संपत्ती मानली जाते. आरोग्य राखल्याशिवाय या संपत्तीचं रक्षण करणं शक्य नाही. हे लक्षात घेऊन कुटुंबाचं स्वास्थ राखणं हे आजच्या अन्नपूर्णेचं महत्त्वाचं कार्य आहे.
ISBN No. | :9789380572468 |
Author | :Dr Malati Karvarkar |
Publisher | :Menaka Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :176 |
Language | :Marathi |
Edition | :2013/01 - 1st/1986 |