akshardhara
Vidnyanachya Ujwal Wata (विज्ञानाच्या उज्वल वाटा)
Vidnyanachya Ujwal Wata (विज्ञानाच्या उज्वल वाटा)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
भारताचे माजी राष्ट्रपती, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि मुलांचे लाडके ‘शिक्षक’ ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि विख्यात तरुण लेखक सृजन पाल सिंग यांनी सखोल संशोधनातून हे पुस्तक साकारलं आहे. यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अतुलनीय कामगिरीने आपण काय साध्य केलं आहे व त्याचे आपल्या भविष्यावर काय परिणाम होणार आहेत, याची रंजक माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकातून त्यांनी भविष्यकालीन विज्ञानाचा, त्यातील क्षेत्रांचा वेध घेऊन त्याविषयीचं व्यापक चित्र आजच्या विद्यार्थ्यांपुढे उभं केलं आहे. तसंच भविष्यात विज्ञानात मोठ्या प्रमाणावर विकसित होणार्या रोबोटिक्स, एरोनॉटिक्स (विमानविद्या), स्पेस सायन्स (अंतराळ विज्ञान), न्यूरोसायन्स (मेंदू विज्ञान) यांसारख्या ‘आउट ऑफ द बॉक्स’ करिअर्सचा सहजसोप्या भाषेत, पण सखोल परिचय करून दिला आहे. पुस्तकाची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून प्रत्येक प्रकरणात त्या त्या शास्त्राची ओळख, त्याची व्याप्ती, तो विषय शिकवणार्या शिक्षकांशी साधलेला संवाद, एका तज्ज्ञाची मुलाखत आणि पालकांसाठी काही टिप्सही देण्यात आल्या आहेत. भविष्यकालीन विज्ञानाचा वेध घेणारं... जिज्ञासूंचं कुतूहल शमवणारं... विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी व भावी वाटचालीसाठी दिशादर्शन करणारं...विज्ञानाच्या उज्ज्वल वाटा!
ISBN No. | :9789382591801 |
Author | :APJ Abdul Kalam |
Publisher | :Rohan Prakashan |
Translator | :Pranav Sakhdev |
Binding | :Paperback |
Pages | :195 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |