Chhatrapati Shivaji Maharajanche Samrajya Gujrat te Shrilanka
Chhatrapati Shivaji Maharajanche Samrajya Gujrat te Shrilanka
Low stock: 1 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मध्ययुगीन भारत हा कृषी व व्यवसाय यात संपन्न होता, मार्को पोलो हा युरोपियन येऊन गेल्यापासून युरोपियन बाजार भारतीयांना उपलब्ध झाला व वास्को-द-गामा याच्यामुळे भारतीय निर्यात समुद्रमार्गे युरोपला युरोपला होऊ लागली, ही समुद्री वाहतूक आफ्रिकेला वळसा घालून इंडोनेशिया मार्गे होई. त्यामुळे भारतीय भूशिर व प्रामुख्याने पूर्व किनार्यावरील तसेच पश्चिम किनार्यावरीलही विविध बंदरात व्यापार 16 व्या शतकात खूप वाढू लागला, त्यामुळे अकबराने दक्षिण भारतात उतरायला सुरुवात केली, त्यामुळे मुघलांनी निजामशहाला हरविणे क्रमप्राप्तच होते. पण निझामशाहीने एतद्देशीय मराठ्यांना हाताशी धरत हे आक्रमण थोपवायचा प्रयत्न केला. यातूनच मराठ्यांचा लष्करीदृष्ट्या विकास होऊन मराठा राज्याचा उदय झाला, ह्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे शहाजी महाराज. युरोपियन तेव्हा अमेरिकेतून सोने आणून ते भारतात विशेषत: दक्खन मध्ये देऊन येथून माल घेऊन जात होते, त्या अर्थव्यवस्थेतूनच कमाई करून मुघल बादशहा शहाजहान याने आग्र्याला महागडा ताजमहाल उभारला पण त्याच्याशी ईर्षा करत, मी दक्षिण भारताचा जणू सम्राटच असे स्वप् न मांडत शहाजी महाराजांनी स्वराज्याचा दगडीमहाल सतराव्या शतकात उभारला. हा महाल म्हणजे दक्षिणेचे मराठा राज्य! शाहपुत्र शिवरायांनी गुजरात पासून दक्षिणेकडे राज्यविस्तार घडविला, या राज्यविस्तारात शिवरायांच्या नेतृत्वाखाली मराठे समुद्र ओलांडून श्रीलंकेत पोहोचले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यविस्तार हा अचंबित करणारा इतिहास.
ISBN No. | :9789384091958 |
Author | :Dr Neeraj Salunkhe |
Publisher | :Lokayat Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :164 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2019 |