Lekmat ( लेकमात )
Lekmat ( लेकमात )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
लेकमात म्हणजे लग्नाची मुलगी. बीड जिल्ह्याच्या डोंगरपट्यातील जे शेतकरी शेतमजूर ऊसतोड कामगार म्हणून पश्चिम महाराष्ट्रात दरवर्षी स्थलांतर करून जातात. त्यांच्या जीवनकलहाचे जिवंत चित्रण म्हणजे ही कादंबरी! एकापरीने शेतकरी शेतमजुरांचे जीवन संपूर्णपणे अभावग्रस्त, हतबल. त्यात बीड जिल्हा कायम दुष्काळी. अशा दु:स्थितीत दरवर्षी घरदार माणस शेती गाव हे सर्व सोडून होणार्या स्थलांतरामुळे या माणसांमध्ये जग कोळून प्यायलेला शहाणपणा आला आहे. ही माणस कचून न जाता स्वत:ला जगवण्यासाठी, मुलाबाळांचे शिक्षण, त्यांचे लग्न यांसाठी हंगामाभर राब राबून पै पै जमवतात. परिस्थितीशी संघर्ष करतात. लेकमातमध्ये एक समांतर अर्थव्यवस्था समांतर समाजव्यवस्था समांतर राजकारण येते. शिवाय ग्रामीण जीवन व्यवहारात घडून येणार्या परिवर्तनाची नोंदही जागोजाग दिसते.
ISBN No. | :9789385565380 |
Author | :Vijay Javale |
Publisher | :Hermis Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :141 |
Language | :Marathi |
Edition | :2020 |