Kordi Sheta Ole Dole (कोरडी शेतं ओले डोळे)
Kordi Sheta Ole Dole (कोरडी शेतं ओले डोळे)
Low stock: 4 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
महाराष्ट्राला गेली २५ वर्षं शेतकर्यांच्या आत्महत्या हा प्रश्न भेडसावतो आहे. सुरुवातीपासून आजपर्यंत रोजच्या बातम्यांपासून विधी मंडळाच्या अधिवेशनापर्यंत, रोजच्या राजकारणापासून ते निवडणुकांच्या राजकारणापर्यंत हा विषय धगधगता राहिला. पण आजही आत्महत्या होत आहेत... या गंभीर समस्येची ‘जाणारा जातो पण मागे जे राहतात त्यांचं काय? ' ही बाजूही तितकीच भीषण आहे. अनुभवी आणि संवेदनशील पत्रकार दीप्ती राऊत यांनी याच प्रश्नाचा सखोल अभ्यास केला. राज्यभर फिरून त्यांनी अशा अनेक महिलांशी संवाद करत प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली. आत्महत्याग्रस्त कुटुंबांची वाताहत प्रत्यक्ष बघितली. परिस्थितीपुढे हतबल झालेल्या अबला त्यांना भेटल्या आणि संकटाशी मुकाबला करत, त्यातून मार्ग काढत जाणाऱ्या अनेक योद्याही त्यांना भेटल्या. सामान्य जनता विचारही करू शकणार नाही अशी ही रोजची लढाई रोजच हरणार्या शेकडो शेतकरी विधवांची होरपळ दाखवणारं आणि दु:खाला जिद्दीने सामोरं जाऊन लढणार्यांची उदाहरणं जगासमोर आणणारं पुस्तक कोरडी शेतं... ओले डोळे !
ISBN No. | :9789386493705 |
Author | :Dipti Raut |
Publisher | :Rohan Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :126 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2019 |