akshardhara
Aksharsadhana ( अक्षरसाधना )
Aksharsadhana ( अक्षरसाधना )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कलावंत व रसिक यांचे नाते सवंग मनोरंजनाच्या आहारी जाऊ नये ही दक्षता घेतली पाहिजे. तसेच कारागिरी व कलाकृती यांतील द्वैत रसिकाने ओळखले पाहिजे. काय घ्यायचे व काय टाळायचे, तसेच काय द्यायचे व काय टाळायचे, यांतला विवेकही ओळखला पाहिजे. आपल्या निर्मितीत व आस्वादात प्रदर्शन नाही, की जाहिरात नाही, हेही ओळखता आले पाहिजे. इथे प्रबोधनापेक्षा उदबोधनावर, समजेपेक्षा उमजेवर आणि ध्वनीपेक्षा प्रतिध्वनीवर अधिक भर असला पाहिजे. जे नाते आपल्या जिव्हाळ्याचे असते. ते इंद्रियांव्दारे प्रकट होताना कमालीच्य संयमाने देखणे झालेले असते. त्यात एक अपूर्व गोडी असते. म्हणून ते वर्णनातीत होते. कलावंत आणि रसिक यांना अभिनवगुप्त एकाच मापाने मोजत. त्याच्या मते अभिजात कलाकृतीची परिपूर्ती हे उभय घटक जेव्हा एकमेकात समरस होतील तेव्हाच साधेल. याचाच अर्थ निर्मिती व आस्वाद, पर्यायाने कलावंत आणि रसिक यांचे नाते हे एकाच नाण्याच्या दोन बाजू राहतील.
ISBN No. | :9789386594594 |
Author | :Madhu Jamkar |
Publisher | :Padmagandha Prakashan |
Binding | :paperback |
Pages | :227 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

