akshardhara
Kunti (कुंती)
Kunti (कुंती)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
काहीशा सनातनी वातावरण असलेल्या परिवारात जन्म. लहानपणापासून नृत्य-संगीताची आवड. पण तिचे वडील डॉ. गजेंद्रप्रसाद त्याविरुद्ध. त्यासाठी कुंतीला घराबाहेर जायलाही मज्जाव करणारे डॉक्टर स्वतः मात्र स्त्रीसहवासाचे शौकीन. मद्यपानाचीही सवय. आपण पसंत करू त्याच्याशीच तिने लग्न केले पाहिजे हा अट्टाग्रह. मणिभद्र नामक तरुण गजेंद्रप्रसादांचा कम्पाउन्डर. बराच छेलबटाऊ. कुंती अठरा वर्षांची असतानाच कुंतीची आई निधन पावलेली. त्यामुळे घरातले सर्व व्यवहार कुंतीच पाहते. डॉ. चा राग, मद्यपान सहन करते. तरुण, देखण्या कुंती त व मणिभद्रमध्ये घनिष्ट संबंध निर्माण होतात. त्यातून तिला दिवस जातात. ती भयंकर घाबरते. मणिभद्रला लग्नाबद्दल सुचवते; पण लुच्चा मणिभद्र गुपचूप पळून जातो. निराश होऊन कुंती न सांगता घर सोडते व जीव देण्यासाठी शहरातल्या तलावाकडे निघते. पण उदरातील गर्भाच्या विचारात तिचे मन पालटते. अपत्याला जन्म देऊन वाढवण्याचा निर्धार करते.
ISBN No. | :9789386888570 |
Author | :Rajanikumar Pandya |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Sudhir Kothalkar |
Binding | :Paperback |
Pages | :508 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2017 |