akshardhara
Tisaryanda Chimanarao (तिस-यांदा चिमणराव)
Tisaryanda Chimanarao (तिस-यांदा चिमणराव)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 208
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
एकदोन दिवसांत आमच्या घरात, ’घर कसे बांधावे?’ ’मध्यमवर्गीय घरांचे एकशे एक नकाशे’, ’गॄहशिल्प’ इत्यादी मथळयांची इंग्रजी आणि मराठी पुस्तके येऊन पडली. आमच्यापैकी प्रत्येकजण ड्राफ्टसमन झाला. आईने रांगोळीने एक प्लान काढला, तर साळूने खेळातल्या लाकडी ठोकळयांचा नमुना तयार केला; मुलांच्या अभ्यासाच्या वहया घराच्या वेगळाल्या प्रमाणचित्रांनी भरून गेल्या. मोरूने स्वत:साठी हवेशीर खोली ठेवली होती, तर राघूनं लाठयालेझिम लपवून ठेवण्यासाठी गुप्त फडताळची योजना केली होती. मैनाच्या प्रमाणचित्रात झोपाळा आणि पाळणा यांची खास व्यवस्था होती. सौ. च्या योजनेत पाहुण्यांची खोली, तर आईच्या रांगोळीत देवघरासाठी स्वतंत्र खोली ठेवण्यात आली होती.
ISBN No. | :9789386931306 |
Author | :C V Joshi |
Publisher | :Deshmukh & Co Publishers Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :208 |
Language | :Marathi |
Edition | :2013 - 1st/1952 |