akshardhara
Dr Anand Yadav Ek Sahityik Pravas (डॉ आनंद यादव एक साहित्यिक प्रवास)
Dr Anand Yadav Ek Sahityik Pravas (डॉ आनंद यादव एक साहित्यिक प्रवास)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कलावंत केवळ स्वत:त रमणारा असतो,या विधानाला यादव अपवाद आहेत. साहित्यदिंडीतील प्रत्येक वारकर्याला त्यांनी आपल्यात सामावून घेतले. त्यामुळे साहित्यरसिकांनी त्यांना संतपद दिले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांना मोठ्या संख्येने मत देऊन निवडले. यादव यांना मिळालेली लोकमान्यता सहन न होऊन काही मतलबी व्यक्तींनी कुटिल राजकारण केले.वैचारिक वाद ही हिंदू संस्कृती आहे. परंतु हे वाद हिंसक पातळीवर नेण्यात आले.यादव या साहित्यसंमेलनासाठी येऊ शकले नाहीत. ही या समाजाची शोकांतिका आहे. प्रतिभावंतांना या गोष्टींविषयी जीवनात ना खंत, ना खेद राहतो. स्वत:च्या कथा, कविता, कादंबर्यांमधून त्यांनी बोली भाषेचे सामर्थ्य जाणकरांच्या लक्षात आणून दिले.यादव यांच्या या कृतीमुळे मराठी ग्रामीण साहित्याला नवे परिणाम प्राप्त झाले अनेक ग्रामीण लेखकांनी आपल्या बोली भाषेतून साहित्यकृती निर्मिण्यास सुरूवात केलीं. आजही ही परंपरा सुरु आहे.मराठी ग्रामीण साहित्याची चळवळ सुरू करुन यादव यांनी ग्रामीण जीवनाचे मराठी साहित्यातून होणारे कृतक दर्शन नाकारले.विविध पातळ्यांवर होणारी ग्रामीण लेखकांची कोंडी फोडली. त्यांच्या लेखनाला वाड;मयीन दृष्टी प्राप्त करुन दिली.
Author | :Anand Yadav |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Hardbound |
Pages | :185 |
Language | :Marathi |
Edition | :2018 |