Bakhar Sanganakachi (बखर संगणकाची)
Bakhar Sanganakachi (बखर संगणकाची)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
संगणकाच्या निर्मितीपासून आजवरचा प्रवास सोप्या भाषेत आणि रंजक शैलीत ओघवत्या पद्धतीनं मांडणारं मराठीतील हे एकमेव पुस्तक आहे. संगणक या यंत्राची कल्पना बरीच जुनी म्हणजे नेपियर आणि पास्कल यांच्यासारख्या गणिततज्ञांच्या काळापासून सुरून झालेला संगणकाचा प्रवास आज कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत येऊन पोहोचला आहे. या काळात संगणकाची संकल्पना, त्याचा आकार, त्याच्याशी संबंधित असलेलं सॉफ्टवेअर यात अमूलाग्र बदल झाले आहेत. सुरुवातीच्या यांत्रिकी तत्त्वांवर आधारित असलेल्या संगणकाचं रूप विजेवर चालणार्या संगणकीय युगानं बदलून टाकलं. त्यानंतर ट्रान्झिस्टर आणि आयसी यांच्या शोधामुळं तर संगणक पारच बदलले. छोट्या आकाराचे आणि खूप जास्त क्षमतेचे संगणक तयार झाले. अनेकजणांच्या मनगटावर छोटा संगणक स्मार्ट वॉचच्या रूपानं दिसतो. संगणकाचा हा प्रवास अक्षरश: थक्क करून सोडणारा आहे. या अद्भुत आणि रंजक वाटचालीचे असंख्य शिलेदार आहेत. त्यांच्या अविस्मरणीय आणि काही वेळा अविश्वासनीय कहाण्या आहेत. या तंत्रज्ञानाचा प्रवास समजून घेणंसुद्धा अत्यंत मनोवेधक आहे.
ISBN No. | :9789387667600 |
Author | :Atul Kahate |
Publisher | :Manovikas Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :332 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2018 |