akshardhara
brahmakanya ( ब्रह्मकन्या )
brahmakanya ( ब्रह्मकन्या )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
झोया फन हे निसर्गाच लेकरू. पूर्व बर्मातल्या जंगलांमध्ये वसलेल्या करेन गावांमध्ये तिच बालपण व्यतीत झाल. तिच्या आईला सैनिकी पार्श्वभूमी लाभलेली तर बाबा करेन प्रतिकार चळवळीतील नेते; पण झोया आणि तिच्या भावा बहिणींना बर्मी जुंत्याने त्यांच्यापुढे काय वाढून ठेवल आहे याची जराही कल्पना नाही. मे यु क्लो नदीच्या काठावर वसलेल्या पेर हे लू गावात त्यांच निरागस, अवखळ बालपण फुलांच्या बागेत खेळण्यात, फुलपाखरांमागे धावण्यात, आंब्याच्या झाडांवर चढण्यात, आंबे फस्त करण्यात झरझर सरत आहे पण एके दिवशी त्यांच्या या सुंदर स्वप्नांना कोणाचीतरी दृष्ट लागावी तस होत. वयाच्या चौदाव्या वर्षी झोयाच बालपण अचानकच संपून जात. तिच्या गावावर बर्मी सैनिक हल्ला करतात आणि जीव वाचवण्यासाठी झोयाला आणि तिच्या कुटुंबीयांना पळ काढावा लागतो. आगीच्या ज्वाळांनी वेढलेल आपले घर डोळ्यांत साठवून त्याकडे पाठ फिरवल्यानंतर त्यांच्या भाळी लिहिलेली असते ती जंगलांमधून अर्धपोटी केलेली वणवण आणि सदैव पाठलागावर असणार्य़ा बर्मी सैन्याची भीती. घरादाराला पारखे झालेल्या हजारो करेन लोकांसारखच हे कुटुंबदेखील जंगलाचा आसरा घेत. लपतछपत थायलंडमधील एका सैनिकी छावणीत आसरा घेत. जन्मजात हुशार झोया शिष्यवृत्ती मिळवून थायलंडमध्ये आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये शिक्षणाकरिता प्रवास करते आणि तिथे आश्रयासाठी अर्ज करते.
ISBN No. | :9789387789029 |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Shraddha Bhovad |
Binding | :paperbag |
Pages | :318 |
Language | :Marathi |
Edition | :2018 |