akshardhara
Bhavananchya Jagat (भावनांच्या जगात)
Bhavananchya Jagat (भावनांच्या जगात)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
असे सतत घडले तर त्या व्यक्तीला आजूबाजूची माणसे दूर ठेवतात. चिडक्या किंवा गोंधळलेल्या व्यक्तीवर सहसा मोठ्या जबाबदाऱ्या टाकताना घरातले किंवा बाहेरचेही थोडे साशंकच असतात. अहंकारी माणसे मर्यादित यश मिळवतात, आणि जरी ती यशस्वी झाली तरी अखेरीस ती एकाकी राहण्याचा धोका असतो. थोडक्यात, माणसाच्या विवेकबुद्धीवर जेव्हा भावनांच्या अतितीव्रतेचा पडदा पडतो, तेव्हा यशस्वितेचे, मानसिक आनंदाचे शिखर गाठणे दुरापास्त होते. भावनांच्या प्रवाहात वाहून जाण्याची सवय असेल तर आयुष्यात खूप मोठ्या धोक्यांना निमंत्रण मिळू शकते. भावनांना नियंत्रणात ठेवून त्यांना बुद्धीच्या साहाय्याने हुशारीने हाताळल्यास आपल्याला हव्या त्या पद्धतीने भावनांचे नियमन करता येते. भावना म्हणजे काय, त्यांचा उगम नेमका कुठे होतो, भावनांचे प्रमाण का व कसे वाढते, भावनांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने नियमन कसे करावे, अशा विविध विषयांवर केलेले भाष्य हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, युवावर्ग, आणि पालकांसाठी भावनिक सजगता वाढविण्याकरिता उपयुक्त मार्गदर्शन : भावनांच्या जगात..
ISBN No. | :9789389834499 |
Binding | :Paperback |
Pages | :96 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |

