Kshitij Ani Kinara ( क्षितिज आणि किनारा )
Kshitij Ani Kinara ( क्षितिज आणि किनारा )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अनय दीक्षित सरांकडून मॅनेजमेंटचे धडे घेत, स्ट्रॅटेजी कोळून पिऊन एमबीए टॉपर मनोरमाचा मल्टिनॅशनल कंपनीत शिरकाव होतो. परस्पर विरोधी असूनही एकमेकांना तोलत, पुरक असणार्या यिन आणि यॅन्ग ची संकल्पना तत्त्वनिष्ठ अनयसाठी आदर्श असते. तर नदीसारख दोन तटांमध्ये मनोरमाला आयुष्य आखून ठेवायच नसत. तिच्या आकांक्षांना क्षितिजापलीकडे झेप घ्यायची असते.
स्वत:चा मार्ग आखण्याच गमक गवसल्याशिवाय कितीही डुबक्या मारल्या तरी गटांगळ्या खाव्या लागतील असे सल्लारूपी वास्तव, बॉस शेखर इनामदार मनोरमाला ऎकवतो. शेखरने दिलेल प्रत्येक आव्हान स्वीकारून, उंच आणि लांब पल्ल्याची उडी मारून, अडथळे पार करायची जिद्द मनोरमा ठेवते.
दीक्षितांबरोबर संसार बहरताना, कॉर्पोरेट करियरचा समतोल राखताना अनेकदा तिची तोलकाठी डगमगते. अर्धस्फुट सत्य, संशयाच वारूळ आणि आरोप प्रत्यारोपाचे भोवरे मनोधैर्य खच्चीकरणास कारणीभूत ठरतात. पण कॉर्पोरेट जगताच्या चक्रव्यूहात शिरल्यावर अंतिम क्षणापर्यंत लढा देत, आत्मविश्वाचा साठा संपू न देण्याच धाडस मनोरमा करते.
ISBN No. | :9789390645053 |
Author | :Vaishali Phatak Katkar |
Publisher | :Dilipraj Prakashan Pvt Ltd |
Binding | :paperbag |
Pages | :320 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |