akshardhara
Ithe Jinkala Bazar ( इथे जिंकला बाजार )
Ithe Jinkala Bazar ( इथे जिंकला बाजार )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
बाजार किती बिनधास्त केवढा सफाईदार त्याचा व्यवहार! कारनामा! करिश्मा! जे म्हणाले ते! जे नाव ठेवाल ते! बाजार, माणसाच्या तडकल्या काचेत घुसतो. त्यात दडून बसतो. त्याचाच एखाद्या एजंटची त्यात नेमणूक करतो. आणि त्या एजंटमार्फत तो ग्राहकाला बेमालूमपणे फसवितो. तडकल्या फुटक्या काचेतून ग्राहकाला स्वत:चीच प्रतिमा स्वच्छ दिसणार नाही, याची काळजी घेतो. माणसाच करिश्माई मेटॅमॉर्फोसिस होते. माणूसच स्वत:ला एखाद्या किड्याच्या रूपात दिसू लागतो. किड्यांचे चेहरे माणसाला माणसांसारखेच दिसू लागतात. त्या रूपावरही माणूस भाळतो, चेकाळतो, लुभावतो! किडे वळवळू लागतात. बाजार अगणित फसव्या गंदगीच्या जादूई कांड्या फिरवितो. त्या कांड्यांवर मेटॅमॉर्फोसिस किडे चढू लागतात, नाचू लागतात, गाऊ लागता. पागल, पागल होतात! बाजार, सौद्यातून सौदे जिंकू लागतो. त्या सौद्यांचा कॅन्सर किड्यांच्या शरीरात पसरत जातो. सौद्यांच्या नालीतला कचरा, घाण, शेणाळावर किड्यांची मेजवानी झडू लागते. झिंग झिंग चढू लागते! आणि किडे पागल पागल होऊ लागतात. काळ हसत राहतो! पागल हॊऊन वावरणार्या किड्यांसोबत मग स्वार्थी किडेसुध्दा पागल होऊ लागतात. बाजार हसू लागतो, नाचू लागतो. आणि रण जिंकल्याच्या गुर्मीत इच्छुक ग्राहकांना पागल बनविण्यासाठी त्याच्या नवनवीन चाली शोधत राहतो. पागल होऊन नाचणारे माणूसकिडे नाचत राहतात बाजाराचे गुलाम बनून..
ISBN No. | :9789390645527 |
Author | :Devendra Punase |
Publisher | :Dilipraj Prakashan Pvt Ltd |
Binding | :paperbag |
Pages | :183 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

