akshardhara
Chen ( चेन )
Chen ( चेन )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अवती भवती घडणार्या कौटुंबिक, सामाजिक, राजकीय घटनाम्चा परिणाम इतरांवर होतो तसा माझ्यावरही होतो. या घटनांवर मला काही बोलल्याशिवाय राहवत नाही. मी लेखनातून बोलतो. उदाहरणार्थ- लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे तरूण तरूणींनी लग्नाशिवाय कंत्राटी पध्दतीने एका छपराखाली राहणे. श्रीमंतांची किंवा राजकीय वरदहस्त असलेली तरूण पोरे दारू पिऊन, बेफाम वेगाने कार चालवून फुटपाथवरची माणसे चिरडतात, राजकीय लागेबांधे असलेले सावकार कुळांना नाडतात व त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आणतात, लग्नाची वचने देऊन पुरुष स्त्रीला फसवतात, शिकली सवरलेली माणसे बुवाबाजीला बळी पडतात, कौटुंबिक वाद व गैरसमज यामुळे भांडणे धुमसतात व आत्महत्येपर्यंत पोहोचतात, चांगल्या लैंगिक छळणूक, स्त्री भ्रूणहत्या, डॉक्टरांकडून होणारी रोग्यांची लूट, गुंडांची खंडणीखोरी, लबाड डेव्हलपरकडून होणारी सहकारी गृहस्ण्स्थांची पिळवणूक अशा विषयांवरच्या बातम्या मी वाचतो, पाहतो व ऎकतो. त्यावर मी विचार करतो आणि या प्रश्नांवर मी हलकीफुलकी उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो. ही उत्तरे तकलादू आहेत, व्यवहारात उअपयोगी नाहीत हे मला समजते. पण साठीच्या वयात व आज अठ्ठयाऎंशी या वयातही दुबळ्या देहाबरोबर मनही हळवे झालेले असते. मला सूर्याकडे गॉगलच्या काचेतून पाहणेच सोसवते. माझ्या कथा वास्तवातील घटनांवर आधारलेल्या असतात. मात्र कथांची उकल विनोदी पध्दतीने केलेली असते. वास्तवात ही उकल टिकणारी नाही; म्हणजेच माझ्या कथांची मर्यादा मला माहीत आहे.
ISBN No. | :9789390645626 |
Author | :B L Mahabal |
Publisher | :Dilipraj Prakashan Pvt Ltd |
Binding | :paperbag |
Pages | :132 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |

