The Ligend Of Bahirji Naik - 1 ( द लिजंड ऑफ बहिर्जी नाईक - 1 )
The Ligend Of Bahirji Naik - 1 ( द लिजंड ऑफ बहिर्जी नाईक - 1 )
Share
Author:
Publisher:
Pages: 332
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Yogita Risbud
मराठा स्वराज्य १६६३ शिवाजी राजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न भंग पावत आहे. उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे शत्रू आहेत. सतत होणार्या आक्रमणांमुळे स्वराज्याच्या सैन्याची धूळदाण उडाली आहे आणि खजिना संपत आला आहे. मुघल सुभेदार शाहिस्तेखान, मराठ्यांचे परंपरागत शहर, पुणे इथे त्याच्या ताब्यातील सैन्यासह तळ ठोकून बसला आहे. सगळ्या आशा मावळल्या आहेत. केवळ, शाहिस्तेखानला पुण्यातून बाहेर पळवून लावणे पुरेसे असणार नाही. टिकून राहण्यासाठी राजेंना स्वराज्याचा खजिना पुन्हा भरून काढवा लागणार आहे आणि सैन्याची पुनर्बांधणी करावी लागणार आहे. इथून शंभर कोसांवर एक शहर बसलेल आहे, सुरत, जणू भ्रष्टाचार आणि कारस्थानांचा नरक, पण सुवर्णाने समृध्द. सुरतवरील हल्ल्याने राजेंच्या सर्व समस्यांचे निराकरण होणार आहे. पण सुरत मुघल हद्दीच्या खूप आत बसलेले आहे. मुघल सुभेदार इनायत खान, पाच हजारांच्या प्रशिक्षित सुसज्ज फौजेसह त्याचे रक्षण करत आहे. स्वराज्य टिकून राहण्याची आशा आता या अशक्य वाटणार्या मोहिमेवर अवलंबून आहे. याची आखणी गुप्तहेर संघटनेला करावी लागणार आहे ज्याचे नेतृत्व बहिर्जी नाईक आणि त्यांचा नवशिका सहकारी, शशिध्वज, एक सोळा वर्षाचा पोरगा करत आहे, जे ही मोहीम फत्ते करण्यासाठी त्यांना ठाऊक असलेल्या सर्व गोष्टींचा वापर करत आहेत. हे गुप्तहेर, इतक्या मोठ्या प्रमाणात पसरलेल्या मुघल शत्रूच्या हद्दीत हालचाली करून राजेंचे सैन्य सुरतपर्यंत घेऊन जाऊ शकतील का? या शहराच्या राखणदारांवर मात करण्यासाठी ते काही युक्ती शोधतील का? यापेक्षा महत्त्वाचे, मराठा स्वराज्य विजयी होईल का? की, सार्वभौम मुघल साम्राज्याविरूध्द उभ्या राहणार्या इतर शेकडो लोकांप्रमाणे ते विनाश पावेल?
ISBN No. | :9789390645688 |
Author | :Shreyas Bhave |
Publisher | :Dilipraj Prakashan Pvt Ltd |
Translator | :Yogita Risbud |
Binding | :paperback |
Pages | :332 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |