Skip to product information
1 of 1

akshardhara

Apale Digital Jivan ( आपले डिजिटल जीवन )

Apale Digital Jivan ( आपले डिजिटल जीवन )

Regular price Rs.198.00
Regular price Rs.220.00 Sale price Rs.198.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आजघडीला आपला भारत देश एका संक्रमणावस्थेतून जातो आहे. सध्या विविध आघाड्यांवरच्या प्रगतीचा किंवा विकासाचा वेग किंचित मंदावल्यासारखा दिसतो आहे खरा. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे जगभरातील काम करण्याच्या पध्दतीवर न भूतो न भविष्यति असा परिणाम झाला आहे. त्यामुळे लोकांच्या जीवनामध्ये फार वेगाने बदल घडताना आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. इंटरनेट ने भूगोल इतिहासजमा केला व आता सर्व वयाचे लोक लॉकडाऊनमुळे तंत्रस्नेही झाले. इंटरनेटमुळे जग लहान झाले असे म्हणता येईल, दूरदेशातील व्यक्तींशी वैयक्तिक, व्यापारी, सामाजिक संबंध जोडणे तेही फक्त काही मिनिटांत शक्य झाले आहे ते ह्यामुळे. आपल्या आसपासच्या डिजिटल विश्वाची सतत उत्क्रांती होत राहणार आहे. त्यामुळेच ह्या तंत्राचे व्यावहारिक उपयोग देखील वाढताना दिसणार आहेत. संगणकीय प्रणालींच्या प्रत्येक क्षेत्रातील प्रवेशामुळे येत्या फक्त १० वर्षांत जगाचे व्यवहार फार मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे, नव्हे ते बदलणारच आहेत. पण हे क्षेत्र सतत बदलत आहे. ह्या सर्वांचा बदल समजून घेणे व तो आत्मसात करणे हे एक कठीण काम एकविसाव्या शतकात जन्मलेल्या पिढीला करावे लागणार आहे. बदलांचा हा वेग येत्या पाचदहा वर्षांत अधिकच वाढणार आहे. तो अधिक सर्वव्यापी तर होईलच पण ज्या पैलूंमध्ये बदल दिसण्य़ाची आपण कल्पनाही केली नव्हती अशा ठिकाणी तो आढळते हे महत्त्वाचे ! ह्या सर्व सुविधांमुळे माणसाचे आयुष्य सुखकर होईल, त्याचे कष्ट वाचतील आणि वेळही.. परंतु ह्या वाचलेल्या वेळाचा वापर मानवाव्दारे कशा प्रकारे केला जाईल ? विधायक मार्गाने जाण्यासाठी की..? हादेखील विचार करणे आवश्यक ती कौशल्ये आत्मसात करणार्‍या व्यक्ती आणि उद्योगच टिकतील.

ISBN No. :9789390645763
Author :Dr Dipak Shikarpur
Publisher :Dilipraj Prakashan Pvt Ltd
Binding :paperbag
Pages :155
Language :Marathi
Edition :2022
View full details