Hindutva Bandhutva Ani Narendra Modi ( हिंदुत्व बंधुत्व आणि नरेंद्र मोदी )
Hindutva Bandhutva Ani Narendra Modi ( हिंदुत्व बंधुत्व आणि नरेंद्र मोदी )
Share
Author:
Publisher: Dilipraj Prakashan
Pages: 176
Edition: latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:
हिंदुत्वातील बंधुत्वाचा विश्वास प्रत्येक वेळी प्रत्येकाला देता येणार नाहीच, पण बंधुत्वातले हिंदुत्व मात्र सर्वसाक्षी ठरू शकते. शिवाय धर्मसंकल्पनात्मक हिंदूत्व भारतीय संविधानाला अमान्य असून बंधुत्व तर लोकशाहीचाच गाभा आहे आणि माझ्या भूमिकेचा प्राण आहे.
नरेंद्र मोदींचा गोध्रा ते पंतप्रधान हा प्रवास, विकास मानायचा का? मोदींचे हिंदुत्व खरच भारतीयत्वात रूपांतरित झालय का? मोदी मॉडेल आणि भागवत मॉडेल यातील सूक्ष्म संघर्ष कोणता? हिंदुत्ववादी मोदींच्या तोंडी गांधी आणि बुध्दाचा जप परदेशातच अधिक का असतो? मोदींचे परराष्ट्र धोरण पं नेहरूच्या वारशातच समृध्द झालेय का? पंतप्रधान मोदी देशांतर्गत प्रश्नांवर पराभूत आहेत का? त्यांच्या हातात भारताचे सार्वभौमत्वसुरक्षित आहे का?
अशा असंख्य प्रश्नांच्या संदर्भाने २०१३-२१ पर्यंतचे माझे चिंतन या ग्रंथात मुक्तपणे व्यक्त झालेय. सदरचे लेख मागच्या ७-८ वर्षांत वेगवेगळ्या कारणाने लिहिले होते. मी विश्वबंधुत्ववादी आहे. सबब, नरेंद्र मोदींची भाटगिरी मला शक्य नाही. पण मी त्याम्चा शत्रूही नाही. मी बहुसांस्कृतिक एकतेचा विश्वधर्म मानतो.
ISBN No. | :9789390645787 |
Author | :Dr Shripal Sabnis |
Publisher | :Dilipraj Prakashan Pvt Ltd |
Binding | :paperbag |
Pages | :176 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |