akshardhara
Krantisurya ( क्रांतिसूर्य )
Krantisurya ( क्रांतिसूर्य )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
क्रांतिसूर्य यशवंतराव होळकर आपल्या नावाप्रमाणे यशवंत तर होतेच पण मनगटात धमक असलेले न भूतो न भविष्यति असे पराक्रमी वीरही होते. यशवंतराव होळकर हे तत्कालीन हिंदी प्रांतातील महेश्वर ( इंदोर ) संस्थानचे अनषिभिक्त राजे आणि लोकमान्य शासक होते. ते फ्रान्सचा सम्राट आणि झुंजार योध्दा नेपोलियनच्या समकालीन होते. जे काम इंग्लंडमध्ये इंग्रजांविरुध्द नेपोलियनने आपल्या तलवारीने केले, तेच काम यशवंतरावांनी हिंदुस्थानात आपल्या शौर्याने आणि स्व बळाने आपल्या समशेरीच्या सामर्थ्याने केले. त्यामुळेच ते आपल्या हयातीतच प्रति शिवाजी म्हणूनही ओळखले गेले.
असे असले तरीही या राजाच्या जीवनकथेला नियतीचा करार असल्यासारखी कारुण्याची, नि:शब्द करणारी झालरही आहे; जी शेवटी मन प्राण झंकारून टाकते. त्यांच्या पराक्रमामुळे उत्तर हिंदुस्थानात ते आजही सुभेदार जसवंतराव हुलकरजी म्हणूनच ओळखले जातात. त्यांच्याबद्दल राजस्थानी कवी जसदान यांनी म्हटल आहे,
दिखणी दिखणी पवन ज्यू ज्यो मत आवे जसवंत
फैल उत्तर कांठल फिरंग कल लोपन करंत.
याचा अर्थ
जर दक्षिणेकडून पवनरूपी यशवंतरावांनी इंग्रजांशी संघर्ष केला नसता, तर इंग्रजरूपी काळ्या मेघांनी भयंकर पाऊस पाडून या पृथ्वीवर प्रलय केला असता.
ISBN No. | :9789390869077 |
Author | :Deepak Chaitanya |
Publisher | :Vishwakarma Publications |
Binding | :paperbag |
Pages | :224 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

