Krishnarang Savala ( कृष्णरंग सावळा )
Krishnarang Savala ( कृष्णरंग सावळा )
Share
Author:
Publisher:
Pages: 174
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Swati Chandorkar
कृष्ण एकमेव असे आहेत जे सार्थक आहेत; कारण मनुष्यजातीच्या इतिहासात एकमेव कृष्ण असे आहेत जे दमनवादी नाहीत. त्यांनी जीवनाच्या सर्व रंगांचा स्वीकार केला आहे. प्रेमापासून ते पळत नाहीत. पुरूष असूनही स्त्रीपासून पळ काढत नाहीत. परमात्म्याला अनुभवताना युध्दाकडे पाठ फिरवत नाहीत. ते करूणा आणि प्रेमाने भरलेले असतानाही लढण्याची समर्थता दाखवतात. अहिंसक चित्त असूनही हिंसेच्या अग्नीत उतरतात. अमृताचा स्वीकार आहे; पण विषाच भय नाही आणि खर तर अस आहे ज्याला अमृत म्हणजे काय हे समजल आहे, त्याची विषाची भीती नष्ट व्हायला हवी: कारण मग ते अमृत कसल विषाला घाबरणार? आणि ज्याला अहिंसेच सूत्र मिळाल त्याची हिंसेबद्दलची भीती नष्ट व्हायला हवी. अशी अहिंसा कशी जी हिंसेला घाबरते? आणि असा आत्मा कसा जो शरीराला घाबरतोही आणि वाचण्याची इच्छाही धरतो? आणि असा परमात्माही कसला जो सर्व जगाला, या संसाराला आपल्या कवेत घेऊ शकत नाही? म्हणून कृष्ण व्दंव्दाला एकाच वेळेस स्वीकारतात. म्हणून हे व्दंव्दच माणसाला जीवनाच्या यथार्थ मार्गावर नेऊ शकते, असा संदेशच श्रीकृष्णांच्या विरोधाभासी व्यक्तिमत्वातून मिळतो.
ISBN No. | :9789391151164 |
Author | :Osho |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Swati Chandorkar |
Binding | :paperbag |
Pages | :174 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |