Skip to product information
1 of 2

akshardhara

Dr Babasaheb Ambedakar Pradnyavantacha Sangharsha ( डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंताचा संघर्ष )

Dr Babasaheb Ambedakar Pradnyavantacha Sangharsha ( डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंताचा संघर्ष )

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन म्हणजेच सामाजिक परिवर्तनाची क्रांतिकारी चळवळ आहे. त्यांच्या जीवनातील प्रत्येक घटनेत परिवर्तनाची प्रक्रिया आहे. या देशात सामाजिक लोकशाहीची स्थापना करण्याच्या दृष्टीने त्यांचा वैचारिक संघर्ष होता. बाबासाहेबांच्या वैचारिक संघर्षाचे, सामाजिक समतेच्या आंदोलनांचे एक व्यापक विचारमंथन अ‍ॅड. जयदेव गायकवाड यांनी या पुस्तकात केले आहे. या अर्थाने, समतेच्या आंदोलनातील बाबासाहेबांचा विचारपट उलगडणारे चरित्रच अ‍ॅड गायकवाड यांनी येथे मांडले आहे. डॉ. आंबेडकरांची ज्ञानसाधना, गांधी आंबेडकर यांच्यातील वाद संवाद, बाबासाहेबांनी दिलेले मानवी हक्कांचे लढे. त्यांचा राजकीय संघर्ष, जातीअंताच्या चळवळीचे तर्कशास्त्र, अर्थशास्त्रज्ञ व नियोजनकर्ते म्हणून योगदान, फाळणीबाबतचे विचार, हिंदू कोड बिलांमागची भूमिका अशा महत्त्वाच्या मिद्यांकडे या पुस्तकात लक्ष वेधण्यात आले आहे. अ‍ॅड. जयदेव गायकवाड हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आयुष्यभर जागर करत आले आहेत. समाजपरिवर्तनाची आस असणार्‍यांसाठी आणि अभ्यासकांसाठीही हे पुस्तक नक्कीच उपयुअक्त ठरेल.

ISBN No. :9789391352318
Author :Jaydev Gaikwad
Publisher :Padmagandha Prakashan
Binding :paperbag
Pages :271
Language :Marathi
Edition :2022
View full details