Mahanubhav Vadmay 1 va 2 ( महानुभाव वाड्मय १ व २ )
Mahanubhav Vadmay 1 va 2 ( महानुभाव वाड्मय १ व २ )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
गेल्या शंभरेक वर्षांत महानुभावांच्या साहित्यावर सांप्रदायिक आणि संप्रदायिकेतर संशोधक अभ्यासकांकडून विपुल लेखन झाले असले, तरी महानुभावीय सांप्रदायिक व्याख्यानपध्दती आणि आधुनिक महानुभावीय व्याख्यानपध्दती या उभय पध्दतींचे सविस्तर अध्ययन अध्यापन झालेले नाही. प्रा बापट यांचा प्रस्तुत दोन भागांचा ग्रंथ त्याच्या नावाप्रमाणे महानुभाव संप्रदायाचे साहित्य आणि तत्त्वज्ञान यांची इतकी सांगोपांग चर्चा करणारा दुसरा ग्रंथ माझ्या अवलोकनात नाही. व्याख्यानपध्दतीचे चिकित्सक समालोचन करताना व्याख्यानांची म्हणजेच साहित्याची आणि तत्त्वज्ञानाची चर्चा आपोआपच होऊन गेली. म्हणजेच या ग्रंथाची फलश्रुती दुहेरी आहे. संप्रदायाच्या विशाल साहित्याचा व सखोल तत्त्वज्ञानाचा परिचय होणे आणि या परिचयातून व्याख्यानपध्दतीचेही आकलन होणे हे दोन्ही प्रवाह ग्रंथामध्ये एकवटले आहेत इतके म्हणण्याइतपत परस्परांत मिसळले आहेत, ती गुंफन हेच एक या ग्रंथाचे स्वतंत्र वैशिष्ट्य होऊन बसले आहे.
ISBN No. | :9789391469290 |
Author | :Dr Shailaja Bapat |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Hard Bound |
Pages | :1373 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |