akshardhara
Zambal (झांबळ)
Zambal (झांबळ)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
भेटलेली माणसे घनदाट होती!
थेट पोचायास कोठे वाट होती?
कवीश्रेष्ठ सुरेश भट यांच्या ह्या काव्यपंक्ती आहेत. काळजाला हात घालण्याची ताकद या ओळींत आहे. याच तोलामोलाची माणसं या कथांत भेटतील. ही माणसं अनेकार्थांनी घनदाट होती. त्यांच्यातली माणुसकी ओतप्रोत होती, मानवी जीवन मूल्यांवरचा त्यांचा विश्वास अफाट होता, त्यांची नाती अतूट मायेची होती आणि मुख्य म्हणजे अंधाराच्या उंबर्यावरच्या प्रकाशखुणा त्यांच्या भाळी होत्या. ही माणसं आपल्या अवतीभवतीच असतात तरीही त्यांच्यातलं वेगळेपण आपल्याला उशिराने जाणवतं. याबद्दलच्या लटक्या स्पष्टीकरणासाठी आपण पळवाटा शोधत राहतो तोवर ते निघून गेलेले असतात. मग त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या थेट वाटा उरत नाहीत, उरतो तो पश्चाताप! ही माणसं चराचरावर जीव लावतात आणि जीवावर उदार होऊन जगत काळाच्या ओघात लुप्त होतात. अशाच काही साध्यासुध्या पण घनदाट माणसांच्या गोष्टींचे हे पुस्तक.
ISBN No. | :9789391547837 |
Author | :Sameer Gaikwad |
Publisher | :Manovikas Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :196 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |