akshardhara
R S S Kholi Ani Vyapti ( आर एस एस खोली आणि व्याप्ती )
R S S Kholi Ani Vyapti ( आर एस एस खोली आणि व्याप्ती )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आपल्या लोककथांमध्ये एका जादूटोणा अवगत असलेल्या राक्षसाची गोष्ट येते. हा राक्षस दुष्ट, अत्याचारी असतो. आख्या जगाला त्यान हवालदिल करून सोडलेल असत. हाहाकार माजविलेला असतो. त्याचा पाडाव करण अशक्य असत, कारण त्यान त्याचा प्राण सातासमुद्रांपलीकड असलेल्या गुहेत एका पोपटाच्या रूपात दडवून ठेवलेला असतो. तो जादूगार तर असतोच, शिवाय तो बहुरूपीही असतो. त्याला अनेक नव्हे तर अनंत रुप धारण करता येतात. या सर्व पेचांतून वाट काढून त्याच्याशी लढायच तर आधी त्याचा प्राण कुठे लपवून ठेवण्यात आला आहे, हे निश्चित करण भाग असत. त्याचा शोध ध्यायला लागतो. आरएसएसची प्राणशक्ती कोठे आहे याच्या शोधात असताना मी अगदी प्राचीन सांस्कृतिक सांडपाण्याच्या टाक्यांमध्ये डोकावलो. कारण त्याची प्राचीन पाळमुळ तेथूनच तर फुटुन वर येत होती, मला जे दिसल ते भयंकर किळसवाण होत. त्याचा कसाबसा एक तुकडा या पुस्तिकेतून तुमच्यासमोर येतोय. त्याच संपूर्ण दर्शन मांडण्याची प्रेरणा यामुळे कुणाला झाली तर हा सर्व खटाटोप सार्थकी लागला, असे मला वाटेल.
ISBN No. | :9789391629281 |
Author | :Devnur Mahadeo |
Publisher | :Madhushree Publication |
Translator | :Datta Dandage |
Binding | :paperbag |
Pages | :62 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

